Kasoda

कासोदा येथे महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे दूध आंदोलन

कासोदा येथे महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे दूध आंदोलन

कासोदा सत्तार खान

कासोदा ता.एरंडोल महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक चालवली असून त्याविरोधात महाराष्ट्र भाजपतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येत असल्याने आज कासोदा येथील गजानन दूध उत्पादक सोसायटीसमोर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करावी म्हणून सरासरी दुधाला १० रुपये वाढीव भाव मिळावा व गाईच्या दुधाला सरासरी ३० रुपये वाढीव भाव मिळावा यासाठी भाजपा तालुकाध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी तालुकाध्यक्ष श्री नरेंद्र पाटील सर, भाजपा शहराध्यक्ष संजय चौधरी, युवा मोर्चा अध्यक्ष छोटू शिरसागर ,रवींद्र पाटील (फरकांडे), लुभान पाटील (नांदखुर्दे),नूरुद्दीन मुल्लाजी , मुजफ्फर अली, निसार शेख, सुनील चौधरी ,डॉ.जगदीश समदानी, पंडित पाटील, केशव वाणी, राम ठाकूर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते .तसेच दूध संस्थेचे चेअरमन संतोष पाटील ,सचिव वासुदेव वारे यांच्याशी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी एपीआय राजेंद्र जाधव , पीएसआय ठाकरे, शरद पाटील पोलीस बंदोबस्तात हजर होते.

Leave a Reply

Back to top button