रावेर

भाजपा कडून मंदिर समितीला ५ लाखांचा निधी सुपूर्द

पद स्पर्श दर्शन रांगेतील भाविकांना मॅट

भाजपा कडून मंदिर समितीला ५ लाखांचा निधी सुपूर्द

रफिक आत्तार

आज कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी.आज पहाटे राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी सपत्निक श्री.विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा केली. त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने तुकाराम भवन मध्ये आयोजित कार्यक्रमात पंढरपूर शहर भाजपाच्या वतीने पद स्पर्श दर्शन रांगेतील भाविकांच्या तळ पायाला खडे टोचू नयेत,यासाठी दर्शन रांगेत मॅट (रेड कारपेट) अंथरणे करिता ५ लाख रुपयांच्या निधीचा धनादेश ना.चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते भाजपा शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी मंदिर समितीचे अध्यक्ष डाॅ अतुलबाबा भोसले यांचेकडे सुपूर्द केला. यावेळी भाजपाध्यक्ष संजय वाईकर यांचे सोबत एव्हरेस्ट इन्फ्रास्टक्चर अॅन्ड डेव्हलपर्सचे संचालक अशोक भोसले,भाजपा कार्यालय प्रमुख आनंद नगरकर उपस्थित होते.

या प्रसंगी व्यासपीठावर मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर,सोलापूरचे जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भोसले,पंढरपूरचे उपजिल्हाधिकारी सचिन ढोले,मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी,व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच मंदिर समितीचे विश्र्वस्त उपस्थित होते. यापूर्वीही आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते पंढरपूर शहर भाजपा व न्यू सातारा समूहाच्या वतीने *पद स्पर्श दर्शन रांगेतील भाविकांच्या तळ पायाला खडे टोचू नयेत , यासाठी दर्शन रांगेत मॅट (रेड कारपेट)अंथरणे करिता ५ लाख रूपये निधीचा धनादेश देण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button