Rawer

मोठा वाघोदा येथे मुसळधार पावसा मुळे २५ वर्षांनंतर नाल्याला महापुर नाला शेजारील लोकवस्त्या जलमय पुलावरील वाहतूक बंद बत्ती गुल तसेच शाळांना मध्यंतरीच सुट्टी

मोठा वाघोदा येथे मुसळधार पावसा मुळे २५ वर्षांनंतर नाल्याला महापुर
नाला शेजारील लोकवस्त्या जलमय पुलावरील वाहतूक बंद बत्ती गुल तसेच शाळांना मध्यंतरीच सुट्टी

प्रतिनिधी/मोठा वाघोदा

रावेर -आज सकाळी ८:३० विजेपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत मोठा वाघोदा सह आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली होती संततधार पावसामुळे गावातील रस्ते गटारी तुंडूब भरुन पावसाच्या पाण्याने वाहत होत्या त्यातच गावातील मध्यभागातून वाहत असलेल्या लेंडी नाल्याला अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने व गावाबाहेर नाल्याच्या घाण पाण्यात उगवलेले मोठमोठ्या ८-१० फुट उंचीईतके इंग्रजी गवतामुळे पाणी अडविले गेल्यामुळे पाणी वाहून न जाता तासाभरात नाल्या शेजारच्या आंबेडकर नगर मुस्लिम वाडा तडवी मटन मार्केट परिसर समाज मंदीर मागील वस्ती मशिदी मागील पाटीलपुरा कुंभारवाडी,मस्कावद रस्त्यावर गोडाऊन परिसरातील मराठा वस्ती मुस्लिम ईदगाहसह शेजारच्या वस्त्यांमध्ये शिरले घरांमध्ये कमरेवर पाणी शिरल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर पडले घरातील जीवनावश्यक अन्न धान्य वस्तू निवारा आदीं वस्तूंची पाण्यात भिजत नुकसान झाले नाल्याला दिवसा पुर आल्याने सुदैवाने जीवितहानी टळली दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाला होता तो रात्री ९ वाजता सुरळीत करण्यात आला जिल्हा परिषद माध्यमिक शाळा यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता मध्यंतरी् विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली याच नाल्याला १९९८ साली अशाच प्रकारे पुर आला होता आणि गोरगरीब जनतेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते तब्बल २५ वर्षे नंतर दुसर्यांदा या नाल्याला पुर आला आहे व शेजारील लोकवस्त्या जलमय होत गोरगरीब जनतेचे असंख्य प्रमाणात नुकसान झाले आहे तरी प्रशासनाने त्वरित नुकसानीचे पंचनामे करून नुकसान ग्रस्तांना तात्काळ मदत करण्याची नुकसान ग्रस्तांकडून केली जात आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button