रावेर

लोहारा येथील सनाझिया इंग्लिश मीडियम शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात

लोहारा येथील सनाझिया इंग्लिश मीडियम शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात

पुणे टी आर टी आय कार्यालयासमोरील उपोषण करणाऱ्या उपोषणकर्ते यांचा ही केला सत्कार

मुबारक तडवी

प्रतिनिधी मोठा वाघोदां ता. रावेर येथून जवळच असलेल्या लोहारा येथील इंग्रजी माध्यमाची शाळा सना_झिया संचलीत LITTLE ANGEL ENGLISH MEDIUM SCHOOL शाळेचा वार्षीक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडला वर्षभर मुलांच्या शिक्षणाचा चढता आलेख व सुप्तगुणांना वाव देण्यासाठी व मनोरंजनात्मक दुष्टीकोणातुन या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते
दरम्यान चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध पथनाट्य मृत्य गीत गायन स्पर्धेत भाग घेऊन योग्य वेशभूषेत भूमिका पार पाडल्या तसेच
लोहारा सारख्या दुर्गम व मागास भागात इंग्रजी माध्यमाची शाळा हवी जेणेकरुन या गावातील भावी पिढी इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातुन जगाच्या प्रवाहात पोहु शकेल. म्हणुन याच उद्देशातुन प्रथमच या शाळेची स्थापना लोहारा येथील माहेरवाशीन प्रा.आरिफा तडवी व इस्माईल सर डोंबिवली यांनी स्थापना याच अनुषंगाने केलेली आहे त्या शाळेचे प्राथमिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले तसेच तडवी भिल्ल समाजातील नंदुरबार अनुसूचित जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाने केलेल्या वटहुकूम जारी केल्या विरोधात पुणे येथील टीआरटीआय कार्यालयासमोर समाज बांधवांनी उपोषण केले होते त्यांतील मुबारक अलिखा तडवी वाघोदा मुराद तडवी मालोद कादर तडवी लोहारा संजीव रमजान तडवी लोहारा यांचाही कार्यक्रमादरम्यान शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन समाज बांधवांन समक्ष सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर माजी सहकार आयुक्त डी बी तडवी साहेब माझे जि प सदस्य कलींदर तडवी सरपंच लियाकत तडवी जफरूल्ला जमादार डॉक्टर पायल तडवी ची आई आबिदा तडवी व वडील सलीम तडवी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष असलम सलीम तडवी इस्‍माईल तडवी सर प्राध्यापक आरिफाताई तडवी विद्यार्थी पालक वर्ग व ग्रामस्थ तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button