sawada

सावदा येथील ॲंग्लो उर्दू शाळेत फक्त बोर्डावर झाला महीला दिवस साजरा!

सावदा येथील ॲंग्लो उर्दू शाळेत फक्त बोर्डावर झाला महीला दिवस साजरा!

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- ८ मार्च जागतिक महिला दिनाचे आपले एक महत्व आहे.या दिवशी महिलांच्या कर्तृत्वासंदर्भात इतिहासात महिलांना प्रतिष्ठीत करणारी आणि महिलांचे प्रतिमाभजंन करणारी इतिहासाची माहिती सह ती एक आई,एक बहिण,एक मुलगी,एक पत्नी म्हणून तिची विविध रुप व त्या प्रत्येक रुपात तिचे कर्तृत्व पराक्रम धैर्य शौर्य मुळे अशा कितीतरी महिलांनी आपल्या नावांची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदणी केली आहे.महणून या दिवशी महिलांचा सन्मान व त्यांच्या कर्तृत्वाचे गुणगान सांगितले जाते.इतरांना प्रेरणा व बोध वाहावे यासाठी ८ मार्च २०२२ रोजी जागभरात विविध प्रकारचे कार्यक्रम घेवून मोठ्या उत्साहात सर्वत्र ठिकाणी म्हणजे सर्व शाळा, महाविद्यालय,सरकारी व निमसरकारी कार्यालय,खाजगी संघटनां,संस्था इत्यादी ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्यात आले.तसा आदेश देखील शासकिय स्तरावर जाहीर करण्यात आला होता.हे मात्र खरे आहे.

परंतु जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित ॲंग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत ज्या पद्धतीने नियोजनबद्ध पणे दि.११ मार्च २०२२ रोजी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला त्याच धर्तीवर जागतिक महिला दिवस निमित्त विद्यार्थी मुलींकरिता कार्यक्रम घेण्यात आला नसल्याची माहिती समजली असता फक्त ८ मार्च रोजी शाळेच्या बाहेरील भिंतींवरील बोर्डावर लिहिले “सदर शाळेचे नावा खाली जागतिक महिला दिन असे लिहून उर्दू भाषेत लिखीत आकृती व या खाली शेवटी उर्दू मध्ये पुन्हा सदर शाळेचे नाव” लिखाण करण्यात आली.मात्र त्यादिवशी कोणताही स्पर्धात्मक कार्यक्रम शाळेत न घेता फक्त महिला दिवस साजरा केल्याचा केवळ दिखाऊपणा करुन औपचारिकतापूर्ण केलेली दिसून येते.जर सदर दिवशी शाळेत स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्यात आला असता तर शाळेतील विद्यार्थी मुलींना कळले असते की,जागतिक महिला दिवस कय आहे?.हा दिवस दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात मोठ्या उत्साहाने का साजरा केला जातो?या दिवसाचे वैशिष्ट्य व महत्त्व काय? या दिवशी महिलांचे गुणगाण व सन्मान का केले जात आहे? महिला ही अबला नसून सबलाच आहे.महिलांचे सशक्तीकरण सक्षमीकरण व सबलीकरण यास प्रोत्साहन देणे का गरजेचे आहे?पुरुषप्रधान संस्कृतीचे पूर्वी काळापासून वाजत आलेले नागडे व यात महिलांना दुय्यम दर्जाची श्रेणीत ठेवून त्यांना मिळत असलेली तशी वागणूक पासून कायमची मुक्ती कशी मिळेल.? यासाठी पुरुषी मानसिकता बदलणे का गरजेचे आहे.? पुरुष व महिला समान आहे.निवड ही एकमेव बाब अमलात यावी.फक्त आणि फक्त याकरिता हा महीला दीवस सर्वत्र ठिकाणी उत्साहाने विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाद्वारे साजरा केला जातो.इत्यादी प्रश्नांचे अर्थबोध उत्तर येथील विद्यार्थी मुलींना मिळाले असते.मात्र सदरची सर्व माहिती येथील शाळकरी मुलींना होवू न देण्या मागे सदर शाळा संचालक मंडळा व मुख्याध्यापक यांची पुरुषप्रधान संस्कृती तर कारणीभूत नाही ना? तरी या प्रकाराकडे वरिष्ठ शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ गंभीरतापूर्वक लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button