Mollywood

आणि रिंकू ने केला रिलेशनशिप चा खुलासा..म्हणाली..हा आहे माझा बॉयफ्रेंड

आणि रिंकू ने केला रिलेशनशिप चा खुलासा..म्हणाली..हा आहे माझा “बॉयफ्रेंड”…!

बॉलिवूड प्रमाणेच मॉलीवूड मराठी फिल्म इंडस्ट्री देखील सध्या जोरात सोशल मीडियावर सक्रिय असते.मराठी अभिनेते आणि अभिनेत्री देखील सोशल मीडियावर आपले फोटो व्हिडिओ शेअर करत असतात आणि चाहते त्यांना फॉलो करत टिका आणि कौतुक देखील करत असतात.सोशल मीडियावर सैराट फेम रिंकू राजगुरू देखील खूप सक्रिय असते. २०१६ मध्ये सैराट चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने सर्व विक्रम मोडत करोडो रु ची कमाई केली.

या सिनेमात परश्या आणि आर्ची या दोन भूमिकांची खूप चर्चा झाली. अभिनेत्रीची मुख्य भूमिका साकारणाऱ्या रिंकू राजगुरूंने आपल्या अभिनयाने आणि बोलण्याच्या शैलीने सर्वाना वेड लावले होते. यानंतर तिने अभिनय क्षेत्रात वाटचाल चालूच ठेवली.त्यानंतर तिने “कांगार” नावाचा सिनेमाही केला.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांसोबत नेहमी संपर्कात असते. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ती नेहमी आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधत असते. नुकतंच तिने इंस्टाग्राम वर “Ask Me Anything” हे सेशन घेतलं त्यावेळी तिने चाहत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

या लाईव्ह संवादा दरम्यान चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. रिंकूनेसुद्धा त्यांना उत्तरे देऊन त्यांचे मन समाधान केले. मात्र एका चाहत्याने तिला “तुला प्रियकर आहे का?” असा प्रश्न विचारला. सहसा सिनेमात काम करणारे लोक सह्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. पण रिंकूने मात्र बिनधास्त होऊन त्या प्रश्नाचे उत्तर देऊन टाकले.

रिंकूला विचारण्यात आलेल्या त्या प्रश्नाचे उत्तर रिंकूने “नाही” अश्या शब्दात दिले. यावर रिंकूने अधिक बोलताना सांगिलते कि, मला बॉयफ्रेंड नाही. पण मला अजूनही माझ्या आयुष्यातील खरा परश्या मिळालाच नाही आहे. जेव्हा हा खरा परश्या भेटेल तेव्हा मी नक्कीच सर्वाना आंनदाने सांगेन.

रिंकूच्या या नकारत्मक उताराने चाहतेही हिरमुसले आहेत. तसेच रिंकू बद्दल सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा होत आहे. अशातच स्पर्शाच्या मनात गुदगुल्या झाल्या असतील यात आहि शंका नाही. पण लवकरच रिंकूचा एक नवीन सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

सिनेमाचे नाव “छूमंतर” असून यामध्ये रिंकू सोबत प्रार्थना बेहेरे, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना हेही कलाकार झळकणार आहेत. तसेच नागराज मंजुळे यांच्या “झुंड” या चित्रपटातही तिने काम केले आहे. या चित्रपटात ‘सैराट’ मधील परश्या अर्थात आकाश ठोसर आणि अमिताभ बच्चन देखील आहेत.

Back to top button