Amalner

Amalner: लोकमान्य विद्यालयात शिक्षकदिन साजरा…

Amalner: लोकमान्य विद्यालयात शिक्षकदिन साजरा…

अमळनेर येथील लोकमान्य विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा
जन्मदिवस ५ सप्टेंबर शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक मनोहर महाजन होते. तर प्रमुख पाहुणे विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक जे. के. चौधरी व मनिषा खांजोडकर होते. शिक्षक दिनानिमित्त विद्यालयात स्वंयशासन दिन साजरा करण्यात आला.

दिवसभर विद्यार्थी शिक्षकाच्या भूमिकेत होते. यावेळी विद्यार्थी मुख्याध्यापक प्रणव भोई तर विद्यार्थीनी मुख्याध्यापिका युक्ती कलंत्री हे इयत्ता १० वीचे विद्यार्थी होते. या कार्यक्रमाला पंकज कॉम्प्युटरचे संचालक राजेंद्र भावसार, डी.एक्स.कॅम्प्युटरचे संचालक श्रीचंद चव्हाण हे उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनी घेतल्या गेलेल्या “स्वातंत्र्य दिन” प्रश्नमंजूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षक प्रथमेश महाजन व अश्विनी मोरे यांनी केले. त्यांना विद्यालयाच्या शिक्षिका सायली देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी शिक्षक पार्थ भावसार याने आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button