Amalner

Amalner: राजकीय भूकंप…भाजपला खिंडार… फोल ठरली वेशी वरची भेट.. माजी आमदारांनी गाठली राष्ट्रवादी थेट…

Amalner: राजकीय भूकंप…भाजपला खिंडार… फोल ठरली वेशी वरची भेट.. माजी आमदारांनी गाठली राष्ट्रवादी थेट…

अमळनेर भाजपचे मोठे नेते तथा माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश घेतला असून त्यांच्यावर पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

अमळनेर विधानसभा मतदारसंघातील एकेकाळी सलग तीन पंच वार्षिक अमळनेरचे प्रतिनिधित्व करणारे,दिवंगत नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या फळीतले दिगग्ज नेते भाजपाचे माजी आमदार डॉ बी एस पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद चंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत आज जळगावात अधिकृत पक्ष प्रवेश केला आहे. त्यांच्यावर लागलीच राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.

डॉ. बी.एस. पाटील हे अमळनेर तालुक्याच्या राजकारणात महत्व पूर्ण भूमिका निभावणारे शिलेदार होते. पण २००९ सालच्या निवडणुकीत त्यांचे तिकिट कापून अनिल भाईदास पाटील यांना पक्षाने पुढे केल्यानंतर ते मागे पडले. यानंतर आता त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत केलेला प्रवेश हा लक्षणीय मानला जात आहे. ते अनिल पाटलांना टक्कर देण्यासाठी मैदानात उतरू शकतात.

दरम्यान माजी आ.डॉ बी,एस पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे तालुक्यात चांगलीच गरमा गरमी निर्माण झाली आहे. भाजपचे कै उदय वाघ यांच्याशी सभेत झालेल्या दांगडो मुळे बी एस पाटील चांगलेच चर्चेत आले होते.आगामी काळात राजकीय समीकरणे कशी बदलतात हे तर काळच ठरवेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button