Amalner

Amalner: पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा..न पा मुख्याधिकारी यानां नियमित पाणी पुरवठा करण्याची घातली गळ..

Amalner: पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा..न पा मुख्याधिकारी यानां नियमित पाणी पुरवठा करण्याची घातली गळ..

अमळनेर शहर प्रतिनिधी येथील गलवाडे रोड प्रताप मिल नगर मधील अनियमित पाणी पुरवठा विरोधात न पा मुख्याधिकारी यांच्या बंगल्यावर महिलांचा हंडा मोर्चा काढून केली नियमित पाणी पुरवठा ची मागणी.

सविस्तर वृत्त असे की,गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून शहरातील झामी चौकातील पाण्याची टाकी जीर्ण झाल्या ने पाडून पाइप लाइन वळविण्याचे काम सुरू होते.दरम्यान वळविलेली पाइप लाइन पुन्हा फुटल्याने दुरुस्तीकामी पाणी पुरवठा थांबविण्यात आल्याने शहरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने खाजगी पाणी पुरवठा करणाऱ्या व्यक्तींनी नागरिकांना अवाच्यासवा दरात पाणी पुरवठा करून लूट सुरू केली.पंधरा दिवस उलटून ही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते योगराज संदनाशिव व दिपक चौघुले यांनी या गंभीर बाबी कडे न पा प्रशासनाचे लक्ष वेधले जावे व हा गंभीर प्रश्न त्वरित सोडवावा म्हणून न पा मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या निवासस्थानी महिलांचा हंडा मोर्चा काढला व नागरिकांच्या समस्या त्यांच्या कानावर टाकल्या.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते योगराज संदनाशिव,दिपक चौघुले,महेश भाऊ कासार,भैया भाऊ नाईक,गोपाल सर,संजू भाऊ चौधरी,मुस्ताक शेख,चंद्रकांत देवकते,रविभाऊ सोनवणे,प्रभाकर आप्पा साबळे,नासिर मुजावर,राहुल भाऊ फुकळे,गंगू आजी,पद्माबाई देवकते,सिंधुबाई मराठे,जयाबाई साबळे,संगीताबाई चौगुले सह अनेक नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button