Rawer

ऐनपूर महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

ऐनपूर महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

निंभोरा बुद्रुक ता. रावेर संदिप को ळीयथून जवळच ऐनपुर येथील सरदारको वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविदयालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे झूम अँपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी समितीचे समन्वयक डॉ.डी.बी.पाटील यांनी केले. डॉ. योगेश तायडे व प्रा. दिलीप सोनावणे या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी यांचा ऋणानुबंध कायम राहावा असे या कार्यक्रमातून दिसून आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी आपल्या अध्यक्षीय समारोप करतांना माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व माजी विद्यार्थी संघटनेची संस्था नोंदणीकृत करण्याविषयी माहिती दिली व त्याविषयी लवकरच पुन्हा एक बैठकीचे आयोजन करण्याचे ठरले. सदर कार्यक्रमास माजी विद्यार्थी तसेच प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डी. बी. पाटील तर आभार प्रा. एस. आर. इंगळे यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button