Nashik

नाशिक चे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर फटाकेबंदीचा निर्णय मागे

नाशिक चे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर फटाकेबंदीचा निर्णय मागे,

नाशिक शांताराम दुनबळे.

नाशिक – उत्तर महाराष्ट्रात फटाकेबंदी लागू करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काल निर्देश दिले होते. मात्र हे निर्णय मागे घेण्यात यावेत म्हणून पालकमंत्री श्री छगनराव भुजबळांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेंशी संवाद साधला असता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक, धुळे, नगर, जळगांव, नंदुरबार जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून यंदा फटाक्यावर निर्बंध घालण्यात यावेत, अशा सूचना केल्या होत्या. दिवाळीत फटाक्यांची मोठी आतषबाजी केली जाते. यामुळे प्रदूर्षण मोठ्या प्रमाणावर होते. दिवाळीत होणारे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी फटाक्यावर बंदी आणण्याचे आदेश, आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले होते.दिवाळीची तयारी सुरु असतानाच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाक्यावर बंदी आणण्याचा प्रस्ताव महासभेत सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. आयुक्त गमे यांच्या या प्रस्तावामुळे यंदाची दिवाळी फटाक्याविना जाणार का? असा सवाल उपस्थित झाला होता. प्रदूर्षण रोखण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व महापालिका, नगरपालिका, आणि जिल्हा प्रशासनाने फटाके विक्री आणि वापर यावर बंदी घालण्याचा ठराव मंजूर करावा, अशी सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पत्राद्वारे केली होती. त्यामुळे यावर्षीची दिवाळी फटाक्याविना साजरी करावी लागण्याची चिन्हे दिसू लागली होती. विभागीय आयुक्तांच्या या पत्रानुसार नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व नगर जिल्ह्यात ठराव झाल्यास दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी करावी लागणार होती. परंतु, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर आता उत्तर महाराष्ट्राला फटाके वाजवून दिवाळी साजरी करता येणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button