Nandurbar

नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई दुधाचे कॅन चोरी करणारी टोळी गजाआड

नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई दुधाचे कॅन चोरी करणारी टोळी गजाआड

नंदुरबार फहिम शेख

नंदुरबार दि 5 ऑगस्ट जिल्ह्यातील शहादा येथील दुध उत्पादक संघाच्या कार्यालयात दुध संकलनाचे शंभर कॅन चोरी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने चौघांना अटक केली त्यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली असुन त्यांच्या कडुन चोरीला गेलेला संपुर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे शहादा शहरातील दुध उत्पादक व कृषीपुरक उद्योग सहकारी संघाच्या कार्यालयाचे मागील बाजूस असलेले लोखंडी शटर तोडुन चोरीस गेलेल्या दुधाच्या एक लाख रूपये किमतीचे शंभर स्टीलच्या कॅन हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले असुन चार आरोपींना अटक करण्यात आली.या गुण्ह्यातील फरार आरोपींचा व गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन व वाहन चालकाचा शोध घेण्यात येत आहे दुध उत्पादक व कृषीपुरक उद्योग सहकारी संघाचे मॅनेजर उद्धव पाटील यांनी या प्रकरणाची फिर्याद शहादा पोलीस ठाण्यात दिली होती हाँ गुन्हा शेतकरी संदर्भात असल्याने पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी गुन्हेगारांना शोधुन सर्व मुद्देमाल परत मिळविण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना आदेश दिले होते.कळमकर यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपी बाबत माहिती काढली असता त्यांना माहिती प्राप्त झाली की दुध उत्पादक संघ येथे झालेली चोरी विशाल व त्याच्या पाँच ते सहा साथीदारांच्या मदतीने केली असुन तो सध्या मलोणी परीसरातच फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तात्काळ मलोणी येथे जाऊन विशाल यास शिताफीने ताब्यात घेतले.त्यास दुध उत्पादक संघ येथे झालेल्या चोरी प्रकरणी विचारपुस केली असता त्याने हा गुन्हा त्याच्या साथीदार अविनाश काशिनाथ सामुद्रे राजेश ब्रिजलाल भिल रवींद्र भगवान भामरे यांच्यासह केल्याची कबुली दिली
या गुन्ह्यातील चार जणांना पोलीसांना ताब्यात घेतले असु फरार आरोपी व गुन्ह्यात वापण्यात आलेले वाहनांचे शोध घेत आहेया गुन्ह्यातील चार जणांना पोलीसांना ताब्यात घेतले असुन फरार आरोपी व गुन्ह्यात वापण्यात आलेले वाहनांचे शोध घेत आहे
सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक देवराम गवळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक राकेश मोरे, अंमलदार विजय ढिवरे,अभय राजपुत, आनंदा मराठे सतीश घुले यांच्या पथकाने केली आहे..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button