Dharangaw

उखळवाडी येथे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम यांच्या वतीने भव्य वृक्ष समारंभाचे आयोजन

उखळवाडी येथे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम यांच्या वतीने भव्य वृक्ष समारंभाचे आयोजन

धरणगाव प्रतिनिधी (कमलेश पाटील)

उखळवाडी दिं. २२ येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल उखळवाडी तर्फे भव्य वृक्ष समारोहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या वृक्षारोपण समारोहप्रसंगी जळगाव जिल्ह्याचे आमदार मा श्री गुलाबरावजी पाटील उपस्थित होते.या वृक्षारोपण समारोह प्रसंगी विविध प्रकारच्या बहुउपयोगी झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम उखळवाडी यांच्यावतीने तब्बल ५००० वृक्षांचे वाटप करण्यात येऊन उपस्थित मान्यवर मा.आ.श्री.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते तसेच कोकमठाण येथील संत तसेच संतमाता यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपण केलेल्या या वनात पारिजातक,औदुंबर,कळंब, रानपाटी,रामफळ,अंजीर,काहीठ, पिंपळ,बिजासार,टेंभुरून,अर्जुसादळा, शे मीवृक्ष,धोवळा,ब्रह्मकमळ,नीलक मळ,महू,चिंचोली,जंगलगोराळे,फासावंगी,आलं, सलई अशा बहुउपयोगी झाडांचा झाडांचे बनलेल्या या वनात भारतीय गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या नावाने ‘कोकिळावन’ असे नामकरण करण्यात आले.
ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी आध्यात्मिक आणि संस्कारशील पिढी घडवणारी भारताचे भविष्य साकार करणारी पिढी असे गौरवोद्गार यावेळी माननीय आमदार गुलाबरावजी पाटील यांनी कौतुक केले. गुरुकुलाच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत जळगाव जिल्ह्यात व पंचक्रोशीत होत असून उखळवाडी गुरुकुलाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल तालुक्याचे आमदार मा.आ.श्री. गुलाबराव पाटील यांनी गुरुकुलामध्ये सभागृह उभारणीसाठी पंधरा लाख रुपये अनुदान देण्याचे यावेळी घोषित केले.

विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण चे सरचिटणीस व उखळवाडी गुरुकुलाचे सल्लागार मा श्री हनुमंतरावजी भोंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुलाचे अध्यक्ष संत रामदास महाराज आयोजित केलेल्या या कार्यक्रमास विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणचे संत प्रेमानंद महाराज,संत चांगदेव महाराज, संत कंकाली महाराज संत सेवादास महाराज संत सूर्यानंद महाराज संत सुदर्शनानंद महाराज संत प्रभावती माई माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, ताराबाई वानखेडे माजी नगराध्यक्ष सावदा नगर परिषद भगवान भादू महाजन कृषी भूमापन धरणगाव माजी चेअरमन नूतन विकास सोसायटी धरणगाव मा श्री गोपाल बापू चौधरी जिल्हा परिषद सदस्य पिंपरी सोनवद गट पद्मालय देवस्थान येथील विश्वस्त ह भ प आनंदराव नामदेव पाटील, दत्तात्रय चौधरी धरणगाव श्रीमती सुशिलाबाई जगन्नाथ पाटील, लोकनियुक्त सरपंचकिरण श्रीराम बागुल धुळे सौ सरलाबाई ज्ञानेश्वर पाटील गोराळखेडे स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य तसेच कोकिळा वन समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरणगाव गुरुकुलाचे प्राचार्य राजेश पाटील,मुख्याध्यापक योगेश सोनवणे,कार्यालयीन अधिक्षक प्रमोद शेलार सर मालेगाव येथील निवृत्त शिक्षक श्री चव्हाण सर शरद पाटील तसेच उखळवाडी गुरुकुलाचे मुख्याध्यापक श्री पगारे सर व इतर शिक्षकवृंद यांनी अथक परिश्रम घेतले.अर्बन बँकेच्या संचालिका सौ वसुंधरा लांडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मा श्री हनुमंतरावजी भोंगळे साहेब यांनी आभार मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button