Latur

शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीने ताब्यात घेऊ शकणारे सरकार, नोटबंदी लादू शकणारे सरकार, लॉकडाऊनमध्ये लोकांवर लाठ्या चालवणारे सरकार प्रायव्हेट औषध कंपन्या,प्रायव्हेट हॉस्पिटल्स ताब्यात घेणार का?? भिम आर्मी जिल्हा उपाध्यक्ष लातुर राम सुरवसे

शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीने ताब्यात घेऊ शकणारे सरकार, नोटबंदी लादू शकणारे सरकार, लॉकडाऊनमध्ये लोकांवर लाठ्या चालवणारे सरकार प्रायव्हेट औषध कंपन्या,प्रायव्हेट हॉस्पिटल्स ताब्यात घेणार का?? भिम आर्मी जिल्हा उपाध्यक्ष लातुर राम सुरवसे
लक्ष्मण कांबळे लातूर
लातूर : एका अभूतपूर्व अशा मृत्यूतांडवातून देश जात आहे. कोव्हिड-19 च्या प्रचंड मोठ्या दुसऱ्या लाटेने आरोग्यव्यवस्थेची, विकासाच्या खोट्या चित्राची लक्तरं काढली आहेत. ऑक्सिजन वाचून तडफडून जाणारे जीव, बेडकरिता दिवसेंदिवस धावपळ करूनही इलाजाविना मरणारे आपले भाऊ-बहिण, प्लाझ्मावाचून किंवा रेमडेसिवीर-टॉसिलीझुमॅब सारख्या औषधांवाचून किंवा त्यांच्या लाखावर पोहोचलेल्या काळ्या बाजारातल्या किमती न परवडल्यामुळे जाणारे जीव, स्मशानात अहोरात्र पेटलेल्या चिता, अग्नी देण्याकरिता किंवा दफन करण्याकरिता सुध्दा लागलेल्या रांगा, रुग्णालयांच्या बाहेर चाललेले आक्रोश, सोबत ऑक्सिजन सिलेंडर घेऊन रुग्णालयावर फूटपाथवर झोपलेले रुग्ण, अॅम्ब्युलन्सच्या सायरनचे न थांबणारे आवाज, लॉकडाऊनमध्ये सरकारी मदतीवाचून भुकेने कळवळणारी बाळं अशी सर्व चित्र मनाचा थरकाप उडवणारी आणि संताप आणणारी आहेत. अशातच महाराष्ट्रामध्ये नाशिक, भांडुप, विरार मध्ये झालेल्या कोव्हिड हॉस्पिटल्स मधील अपघातांनी संतापाची तिडीक निर्माण केली आहे.
इथे फक्त ‘व्यवस्था’ अपयशी ठरलेली नसून, नफ्याकरिता चालणारी आरोग्य व्यवस्था अशीच असू शकते हे समजणे आवश्यक आहे. हे भांडवली उत्पादन व्यवस्थेचे संरचनागत अपयश आहे ज्याला सत्तेत बसलेल्या फॅसिस्टांच्या मानवद्रोही कारनाम्यांमुळे अजून भीषण रूप आले आहे…
केंद्र आणि राज्य सरकारांचे दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष करत आहे !
म्हणून याला सर्व केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे असे भिम आर्मीचे लातुर उपाध्यक्ष राम सुरवसे म्हणाले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button