Chandwad

चांदवड शहरातून पोलिसांकडून दंडात्मक कारवाईत 94000 दंड वसूल

चांदवड शहरातून पोलिसांकडून दंडात्मक कारवाईत 94000 दंड वसूल

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : चांदवड शहरातून 471 जणांवर दंडात्मक कारवाई तून 94 हजार दोनशे रुपये दंड वसूल केल्याची चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांनी माहिती दिली आहे.चांदवड तालुक्यातील सर्व नागरिकांनी शासनाचे कोरोना पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांनी केले.या काळात विना कारणास्तव नागरिकांनी बाहेर फिरू नये.
तसेच शासनाने लावून दिलेल्या नियमाचे निर्बंध पाळणे गरजेचे आहे. सकाळी 11 नंतर चांदवड शहरातून सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी महिला पोलीस कर्मचारी होमगार्ड परेड मार्च करून नियम न पाळणार्‍या व्यक्तींकडून दंड वसूल केला जात आहे .यावेळी पीएसआय विशाल सणस,पीएसआय गजानन राठोड ए पी आय पोपट कारवाल पोलीस हवालदार समीर शेख योगेश हेमबाडे,एम यु देशमुख,बिन्नर, ललित चौधरी ,चंद्रकांत पवार सानप ,डोंगरे ,अशोक पवार गायकवाड मोरे चव्हाण,बस्ते बागुल ,सौंदाणे महिला कर्मचारी साळवे ,जगताप , काळे मॅडम व होमगार्ड आदींनी ही कारवाई केली आहे,अनेक वाहनचालक परवानगी पेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक करताना आढळले आहेत पोलीस त्यांकडे लक्ष ठेऊन असतात,गणुर चौफुली परिसरात अनेकांवर कारवाई केल्याचे चित्र आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button