Jalgaon

हतनूरचे 41 दरवाजे उघडले…नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा….तापी नदी पात्रात 76 हजार 993 क्यूसेक विसर्ग….

हतनूरचे 41 दरवाजे उघडले…नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा….तापी नदी पात्रात 76 हजार 993 क्यूसेक विसर्ग….

जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी नदी पात्रात हतनूर धरणाचे 41 दरवाजे पुर्ण क्षमतेने उघडल्याने तापी नदीपात्रात 76 हजार 993 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. सुलवाडे प्रकल्पाचे 12 दरवाजे 3 मीटर उघडल्याने तापी नदीपात्रात 91 हजार 665 क्युसेक्स विसर्ग होत आहे. पुढील 72 तासांत हतनूर आणि सुलवाडे प्रकल्पातून तापी नदीपात्रात मोठा विसर्ग सोडण्यात येणार आहे.

नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. हतनूर धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button