Nashik

येवला येथील ऑक्सिजन जनरेशन प्लांट व रुग्णवाहिके चे लोकार्पण

येवला येथील ऑक्सिजन जनरेशन प्लांट व रुग्णवाहिके चे लोकार्पण
शांताराम दुनबळे नाशिक
नाशिक : नाशिक जिल्ह्यात सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये एकूण ५५ ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या माध्यमातून ५० मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होणार असून जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण होणार आहे.
येवला नगरपालिकेचे नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, नगरपालिका गटनेते प्रवीण बनकर, प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा कृपास्वामी, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस निरीक्षक कोळी, अंदरसुल बाजार समितीचे सभापती मकरंद सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
“५५ ठिकाणी होणार ऑक्सिजन प्लांट”
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात २, जिल्ह्यातील विविध नगरपालिका क्षेत्रात ९, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येवला, मनमाड, कळवण, चांदवड, ग्रामीण रुग्णालय पिंपळगांव बसवंत, इगतपुरी, सिन्नर, अभोणा, वणी, दिंडोरी, बाऱ्हे, घोटी, गिरणारे, हरसूल, निफाड, नगरसूल, लासलगांव, देवळा, उमराणे, सटाणा, नामपूर, मालेगांव सामान्य रुग्णालय आणि महिला रुग्णालय या २४ ठिकाणी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण होणार आहेत. तसेच केंद्र सरकारच्या निधीतून नांदगाव, दाभाडी, पेठ सुरगाणा या ४ ठिकाणी तर सिक्युरीटी प्रेसच्या सीएसआर फंडातून दोडी व त्र्यंबकेश्वर, गिरणारे, डांगसौंदाणे तसेच नाशिक ग्रामीणसाठी ५ असे एकूण ५५ ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण होणार आहेत.
यावेळी येवला उपजिल्हा रुग्णालयाची व कोविड सेंटरची पाहणी केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button