Amalner

?️ Big Breaking..लॉक डावूनचया काळात प्रवासी वाहतूक पासचा अवैध दारू विकण्यासाठी गैरवापर…तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल..

?️ Big Breaking..लॉक डावूनचया काळात प्रवासी वाहतूक पासचा अवैध दारू विकण्यासाठी गैरवापर…तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल..

अमळनेर

शहरात कोरोना पार्श्वभूमीवर सध्या लॉक डाऊन सुरू आहे. पण अवैध धंद्यांना मात्र उत आला आहे.लॉक डावूनच्या काळात जिल्हा बंदी असल्याने अतिआवश्यक सेवा सुरू आहेत.यातच प्रवासी वाहतुकीचा शासकीय
पास वापरून अवैध दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अश्या प्रकारे अवैध दारू वाहतूक करणाऱ्या
वाहनाची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार या वाहनावर लक्ष ठेवून असताना वाहन चालकाने पळ काढला परंतु पोलिसानी वाहनाचा
पाठलाग करून एक आरोपी ताब्यात घेतला असून काही जण फरार झाले आहेत.

दारु आणि वाहनसह साडेचार लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे.भा द वि 417,188,म दारू बंदी आदिनीयम 65 A E साथीचे रोग अधिनियम कलम 2,3 4 मोटर वाहन आधी नियम 179 (1),184 प्रमाणे
आरोपी राज अरविंद खंदार ,बाळू कंजर
विक्की संतोष ललवाणी यांच्या वर रात्री 8 ते 8.30 च्या दरम्यान गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदर वाहना संदर्भात पोलिसांना धरणगाव
(क्रमांक एमएच – १८, एजे६३९७) अवैध दारू येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी , रवींद्र पाटील , दीपक माळी , मधुकर पाटील
यांच्या पथकाला ढेकू खुर्द येथे अडवण्यास गेले होते. पोलिसांना पाहताच वाहन चालकाने वेगाने वाहन पुढे दामटून पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. चालकाने वाहन आड रस्त्यावर वळवून रडावन मार्गे पारोळा
तालुक्यातील चिखलोड शिवारात पळवली आणि झाडांमध्ये अवैध दारू माल लपविला.

सदर व्यक्ती कडे प्रवासी वाहतूक परवाना निकिता खंदार या नावाचा पास होता. त्याची
मुदत १२ ते १५ मे अशी होती.

या प्रकरणाचा तपास गणेश सूर्यवंशी करत असून
फिर्यादी रवींद्र पाटील हे आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button