Nashik

वाढदिवसाचा खर्च टाळून घरोघरी होमिओपॅथी औषधाचे वाटप ,

वाढदिवसाचा खर्च टाळून घरोघरी होमिओपॅथी औषधाचे वाटप

गणेश बनकर यांचा अनोखा उपक्रम २५ हजार कुटूंबापर्यंत पोहचवणार औषध

शांताराम दुनबळे

नाशिक -:जगभरात कोरोना आजाराणे थैमान घातले असून संपूर्ण भारत देश ह्या आजाराशी लढा देत आहे प्रत्येक जण आपआपल्या परीने होईल त्या मार्गाने देशसेवा करतना दिसत आहे याच भावनेतून अल्पावधीतच आपल्या कार्यातून पिंपळगावकरांच्या मनामनात मोहर उमटविनाऱ्या पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, गणेश बनकर यांनी कोरोना पार्श्वभूमीवर शुक्रवार दि.२२ रोजी होणाऱ्या वाढदिवसाचा खर्च टाळून त्याऐवजी पिंपळगाव शहरासह परिसरातील नारायणटेबी .बेहड ,अंतरवेली ,मुखेड उबरखेड या गावातील घरोघरी कोवीङ च्या माध्यमातून भारत आरोग्य मंत्रालय यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी सूचित केलेले होमिओपॅथी आर्सोनिक अल्बम 30 औषधांचे वाटप आपल्या स्वखर्चाने मोफत वाटप सुरू केल्याने पिंपळगावकरांसह गटातील नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी होमिओपॅथी औषधे खऱ्या अर्थाने लाभदायी ठरणार आहे.

गणेश बनकर यांनी यंदाचा वाढदिवस साजरा न करता त्याऐवजी पिंपळगाव बसवंत शहरासह पिंपळगाव गटातील गावामध्ये आपल्या स्वखर्चाने घरोघरी होमिओपॅथी औषधांचे वाटप दि.२२ पासून सुरू केले आहे. पिंपळगाव शहरासह संपूर्ण पिंपळगाव गटातील जवळपास २५ हजारांहून अधिक कुटुंबांना औषधे वितरित करण्याचा मानस आपल्या प्रतिनिधी शी बोलताना व्यक्त केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button