Nashik

दिंडोरी नगरपंचायतीचे वतीने 90 कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तू व सेफ्टी किटचे वाटप

दिंडोरी नगरपंचायतीचे वतीने 90 कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तू व सेफ्टी किटचे वाटप

सुनील घुमरे नाशिक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी नगरपंचायतीचे वतीने 90 कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तू व सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले . नगराध्यक्षा रचना जाधव उपनगराध्यक्ष कैलास मवाळ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मयुर पाटील , नगरसेवक प्रमोद देशमुख तुषार वाघमारे निलेश गायकवाड रत्‍नाबाई बोरस्ते आशाताई कराटे, दिलीप जाधव, काका देशमुख व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते वाटप करण्यात आले.या प्रसंगी धीरज भामरे, प्रशांत पोतदार, सुनील पाटील, ईश्वर दंडगव्हाळ, सचिन जाधव, तानाजी निकम, राजेंद्र खिरकाडे,अमोल मवाळ हर्षल बोरस्ते, सागर भदाणे आनंदा खराटे दीपक सोलंकी रामदास चारोस्कर आदींसह कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी डॉ मयूर पाटील यांनी कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले.
दिंडोरी नगर पंचायतीचे नगरसेवक तथा चैतन्य बहुउद्देशीय सहकारी संस्था दिंडोरी चेअरमन श्री निलेश गायकवाड व संस्थेचे सभासद यांच्यामार्फत गोरगरिबांना मदत म्हणून 130 किट अन्नधान्याचे देण्यात आले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button