रावेर

ग्रामीण रुग्णालय पाल व रावेर येथे एकूण 47 विना टाका /लेप्रोस्कोपीक शस्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांच्या हस्ते संपन्न

ग्रामीण रुग्णालय पाल व रावेर येथे एकूण 47 विना टाका /लेप्रोस्कोपीक शस्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांच्या हस्ते संपन्न

विलास ताठे
आज तालुक्यातील पाल ग्रामीण रुग्णालयात 2011 नंतर आज तब्बल 8 वर्षा नंतर आदिवासी भागातील कर्मचारी व मा.जिल्हा शल्यचिकित्सक तसेच मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डी.एस.पोटोडे यांच्या विशेष प्रयत्नाने शिबिराचे आयोजन शक्य झाले.त्यात प्रा.आ.केंद्र लोहारा येथील 25 व निम्भोरा येथील 2 अश्या एकूण 27 शस्रक्रिया करण्यात आल्या .त्याचप्रमाणे रावेर ग्रामीण रुग्णालयात प्रा.आ.केंद्र एनपूर येथील 10, ,वाघोड -4,चिनावल 3 ,थोरगव्हाण -3 असे 20 पेशंट यांचा कुटुंब नियोजन शस्रक्रिया चा मेगा camp सर्वांच्या सहकार्याने संपन्न झाला.यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक चव्हाण सर यांनी स्वतः शस्रक्रिया केल्यात. शस्रक्रिया शिबिर यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला,डॉ.एन.डी.महाजन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शिवराय पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद ठाकूर, डॉ.कुणाल मोरे , डॉ.अनुपम अजनसोंडे, डॉ.तुषार चौधरी ,डॉ.मोनिका चौधरी, डॉ.चंदन पाटील, डॉ.संदीप चवरे , डॉ.सचीन पाटील आरोग्य सहाय्यक रामभाऊ चौधरी , सहाय्यीका के.जी.बरडे तसेच सर्व प्रा.आ.केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी व ग्रामीण रुग्णालय येथील मुख्य अधिपरिचरिका कल्पना नगरे, लता कोल्हे व स्टाफ यांचे सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button