Dewala

ईनरव्हिल क्लब अपेक्सच्या अध्यक्षा सौ.अपर्णा नंदकिशोर येवलकर यांच्याकडून सन कॅपचे मोफत वाटप

ईनरव्हिल क्लब अपेक्सच्या अध्यक्षा सौ.अपर्णा नंदकिशोर येवलकर यांच्याकडून सन कॅपचे मोफत वाटप

ठोस प्रहार प्रतिनिधी श्री महेश शिरोरे

ईनरव्हिल अपेक्सच्या अध्यक्षा सौ.अपर्णा नंदकिशोर येवलकर यांच्या तर्फ जिल्हा परिषद शाळा,कौतिकपाडे (औंदाणेपाडा) येथे टुगेदर वुई कॅन आणि लोगो एव्हरीवेअर या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थिस टोंपीचे (सन कॅप) मोफत वाटप करून सोशल डिस्टसींगचे पालन करण्यात आले.
शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत, परंतु, शिक्षक लोकांचे अधिकृत काम सुरू झाले आहे .. तर, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा सुरू नाहीत, परंतु जवळपास राहणारे फक्त तीन शिक्षक व दोन विद्यार्थी तसेच सामाजिक अंतर असलेल्या शासनाच्या नियमाने क्लब अध्यक्ष सौ.अपर्णा नंदकिशोर येवलकर व सचिवांसह सहा जण मिळून (लाॅकडाऊनमुळे एप्रिल महिन्यातला) बाकी असलेला हा प्रलंबित ऊपक्रम पुर्ण करण्यात आला.

यावेळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जिभाऊ दौलत मोरकर, मुख्याध्यापक भाऊसाहेब पवार,उपक्रमशील शिक्षक नंदकिशोर वसंत विखरणकर ,शिक्षिका अहिरे मॅडम व तीन – चार विद्यार्थी ऊपस्थित होते.
अपर्णा येवलकर यांनी इनरव्हील क्लबचे अध्यक्ष स्थान भूषवित असताना आपल्या जिवाची पर्वा न करता तन मन लावून कोरोनाच्या लढाईच्या (कोविड-१९) च्या काळात देखील ग्रामिण भागात जाऊन सामाजिक उपक्रम सुरू ठेवून एक समाजात आपला वेगळा ठसा ऊमटविला आहे असे म्हणून मुख्याध्यापक व शिक्षक नंदकिशोर विख्रणकर यांनी क्लबचे भरभरून कौतुक करत कार्यक्रमाची सांगता केली.
प्रास्तविका क्लबच्या अध्यक्षा सौ.अपर्णा येवलकर यांनी केले व सचिव माधुरी अमृतकर यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button