आटपाडीमध्ये तालुकास्तरीय युवा सांसद संपन्न
राहुल खरात
नेहरू युवा केंद्र, सांगली व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय युवा सांसद कार्यक्रम संपन्न झाला. युवकांमध्ये देशसेवेची भावना निर्माण व्हावी,युवा कौशल्य निर्माण व्हावे यासाठी
कला व विज्ञान महाविद्यालय,आटपाडी येथे योग परिचय एवं युवा सवांद,”स्वच्छ भारत अभियान” व “श्रमदान”, सुशासन संकल्पना व गावपातळीवरील उपक्रम याविषयी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. योग परिचय एवं युवा सवांद विषयावर मार्गदर्शन मानदेशातील चित्रपट श्रुष्टीमधील लेखक व दिग्दर्शक व योगा शिक्षक मा.प्रा.बालाजी वाघमोडे सर यांनी केले.
“स्वच्छ भारत अभियान” व “श्रमदान”
तसेच याविषयी मा.प्रा.संतोष सावंत सर यांनी मार्गदर्शन केले, केले. लिंग गुणोत्तरातील तफावतसुशासन संकल्पना व गावपातळीवरील उपक्रम या विषयी मा. रामदास नाईकनवरे सर यांनी मार्गदर्शन केले , तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील सर यांनीही खूप मोलाचे सहकार्य केले.
तसेच या कार्यक्रमाचे अतिशय खुमासदार सूत्रसंचालन मा.प्रा.चंदनशिवे सर यांनी पार पाडले.त्याचबरोबर या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य
प्रा.डॉ.विजयकुमार पाटील सर तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन व आभार प्रदर्शन आटपाडी तालुका प्रतिनिधी राहुल नवले, व विनोद कदम यांनी केले.सदर कार्यक्रमात १22 लोक उपस्थित राहिले. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपस्थितांना योग पुस्तिका वाटप करण्यात आले.





