Amalner

अमळनेर: कोरोना मध्ये मृत व्यक्तींच्या सानुग्रह अनुदानासाठी वारसांनी कागदपत्रांची पूर्तता करावी..! अशी आहेत कागदपत्रे..!

अमळनेर: कोरोना मध्ये मृत व्यक्तींच्या सानुग्रह अनुदानासाठी वारसांनी कागदपत्रांची पूर्तता करावी..! अशी आहेत कागदपत्रे..!

अमळनेर कोव्हीड19 या कोरोना विषाणुजन्य आजारामुळे मयत झालेल्या व्यक्तींना शासन महसूल व वन विभाग, यांचेकडील दि.26.11.2021 चे शासन निर्णयानुसार 50000/- पन्नास हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधुन प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे.
त्यानुसार अमळनेर तालुक्यात राहणारे कोविड-19 ने मृत झालेल्या व्यक्तींची ICMR ID असलेली एकुण 156 व्यक्तींची यादी प्राप्त झालेली आहे. सदर यादी तालुका वैद्यकीय अधिकारी अमळनेर व मुख्याधिकारी अमळनेर यांचेकार्यालयात उपलब्ध आहे. तरी सदर मयत व्यक्तींचे वारसांना शासनाची मदत तातडीने देणेकामी तपासणी करुन कागदपत्रांची पुर्तता करणेबाबत निर्दश देणेत आलेले आहे. सदर निर्दशानुसार खालीलप्रमाणे नमुद कागदपत्र जमा करणेकामी या कार्यालयामार्फत मुख्याधिकारी नगरपरिषद अमळनेर, तालुका वैद्यकीय अधिकारी अमळनेर, तलाठी, ग्रामसेवक, अरोग्य सेवक, अशा वर्कर्स इत्यादी कर्मचारी यांची नेमणुक करणेत आलेली
आहे. तरी मयत व्यक्तींचे वारसांना शासनाची मदत तातडीने देणेकामी खालील नमुद कागदपत्रांची आवश्यकता आहे.

1. Mahacovid19relief.in या वेबसाईटवर अर्ज भरलेला असल्यास अर्ज क्रमांक
2. अर्जदाराचे आधार कार्ड
3. अर्जदाराचा cancel चेक / धनादेश / बँक पासबुकाची पहिल्या पानाची छायांकित प्रत
4. मयत व्यक्तीचे आधार कार्ड,
5. मृत व्यक्तीचा मयत दाखला.
6. मृत व्यक्तीचे हॉस्पिटलने दिलेले मृत्यु प्रमाणपत्र
7. मयत व्यक्तीशी असलेले नाते याबाबत पुरावा (रेशन कार्ड छायांकित प्रत)

तरी अमळनेर तालुक्यतील कोविड-19 (कोरोना) या अजारामुळे मयत झालेल्या
नातेवाईकांना अवाहन करणेत येते की, आपले वर नमुद कागदपत्र ग्रामस्तरीय अधिकारी /कर्मचारी यांचेकडेस जमा करावे जेणेकरुन शासनामार्फत येणारी मदत ही तातडीने आपले खात्यास वर्ग करणेबाबत कार्यवाही करता येईल. असे अवाहन तहसिलदार अमळनेर हे करीत आहेत. तसेच नगरपालिका अमळनेर व तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालयात सर्व कागदपत्रासह परिपुर्ण प्रस्ताव सादर करावा. असे आवाहन तहसिलदार अमळनेर यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button