Nagpur

उमरेड तालुक्यातील हळदगावात पावसाचा कहर

उमरेड तालुक्यातील हळदगावात पावसाचा कहर

उमरेड तालुक्यातील हळदगावात पावसाचा कहर

उमरेड तालुक्यातील हळदगाव येथे पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरल्याने तेथे जनजीवन विस्कळीत झाले. उमरेड तालुक्यात आतापर्यंत सरासरी ८४३.३४ मीमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.
चांपा : प्रतिनिधी अनिल पवार
मान्सून अंतिम टप्यात असताना मात्र नागपुर जिल्ह्यात पाऊस चांगलाच खूश दिसून येत असून दोन दिवसांच्या संततधार  बरसलेल्या पावसाने उमरेड तालुक्यातील हळदगावात  कहर केला आहे.उमरेड तालुक्यातील पाचगाव सर्कल मध्ये सरासरी६३२.२मिमी पावसाची नोंद घेण्यात आली .  हळदगाव  येथे पावसाने पाणी लोकांच्या घरात शिरल्याने तेथे जनजीवन विस्कळीत झाले. तर उमरेड  तालुक्यातील हळदगावात  अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यातील दमदार पावसामुळे जिल्ह्यातील शेतीची कामेही आटोपली शिवाय प्रकल्पांनाही चांगले पाणी आले. यामुळेच जिल्ह्यातील पाण्याची समस्या सुटल्याचे दिसत होते. त्यात मात्र मंगळवारी  (दि.३) रात्री व बुधवारी  (दि.४) सकाळी बरसलेल्या पावसामुळे उमरेड तालुक्यात आणखीच पाणीदार झाला आहे. पहाटे पासून सुरू झालेल्या पावसाने उमरेड  तालुक्याला पार झोडपून काढले असून चांगलाच कहर केला आहे. तालुक्यातील हळदगावात लोकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. शिवाय, गावात पाणी साचून असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. रस्त्यांवर पाणी साचल्याने लोकांना पाण्यातूनच वाट काढावी लागत असल्याचे चित्र बघावयास मिळाले. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने काही घरांची पडझड होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याबरोबर अन्न, धान्य व कपडयांची नासधूस झाली आहे. मातीच्या घरांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे दिसत आहे. शेत शिवारात पाण्याचा तडाखा जास्त असल्याने शेतीची नासधूस झाली आहे. गेल्या १० वर्षांत कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस आला नाही, असे हळदगावातील नागरिक सांगत आहेत.यावेळी सरपंच जिजाबाई छापेकर व त्यांचे पती यांनी तत्काळ गावातील घरात साचलेले पाणी घराबाहेर काढण्याचे काम सुरू केले .सरपंच स्वता  श्रमदान करीत असल्याने ग्रामस्थांनी सुध्दा आपली समस्या आपणच सोडविण्याचे उदाहरण हळदगाव वासियांनी दिले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button