सायगाव येथील प्रसिद्ध दत्त जयंती यात्रोत्सवनिमित्त कुस्त्यांची भव्य दंगल
मनोज भोसले
माजी पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन, आमदार मंगेशदादा चव्हाण, आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली…
यावेळी सांगलीचा पैलवान सुरज निकम विजेता तर हरियाणा येथील पैलवान वरुण कुमार उपविजेता ठरला,
१ लाख ५१ हजार रोख बक्षीस व चांदीची गदा देऊन विजेत्याचा सन्मान करण्यात आला…*
ट्रिपल महाराष्ट्र केसरी डीवायएसपी विजय चौधरी यांनी पंचाची जबाबदारी सांभाळली तर हिंदकेसरी रोहित पटेल, उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांची विशेष उपस्थिती यावेळी होती.
यावेळी पंचक्रोशीतील सामाजिक, राजकीय, क्रीडा, शैक्षणिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व हजारोंच्या संखेने कुस्तीप्रेमी उपस्थित होते.
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना डीवायएसपी पदावर रुजू करण्यासाठी माजी पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी मोठा पाठपुरावा केला होता त्याचेच फलित म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन शासन निर्णय काढून विजय चौधरी यांची त्या पदावर विशेषबाब नियुक्ती केली होती याचे स्मरण करत गिरीशभाऊ यांच्याविषयी सायगाव पंचक्रोशी वासियांनी कृतज्ञता व्यक्त केली.






