शाहू मराठा महिला मंडळ चाळीसगाव तर्फे शिवजयंतीउत्साहात साजरी
चाळीसगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने शाहू मराठा महिला मंडळाच्या सदस्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच मंडळाच्या अध्यक्षा सौ. आरस्ता माळतकर यांनी महाराजांचे कमीत कमी पाच गुण जरी आपण अंगीकारले तर खुप मोठा बदल आपल्या जीवनात घडून येवू शकतो हे सांगितले. छत्रपती शिवाजीराजे तर गुणांची खाण आहेत त्यांचा आपण थोडा जरी वाण घेतला तर जीवन आदर्श झाल्या शिवाय राहणार नाही.
शिवजयंती सोहळा कोरोना काळानुसार शासकीय नियमानुसार आयोजित करण्यात आला. यावेळी मंडळाच्या मा. सचिव सौ. अनिता शेळके यांनी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. या कार्यक्रमाला सौ. शकुंतला शेळके, अनिता दुसिंग, रत्नमाला जाधव, मनिषा गायके, अनिता जाधव, संगिता जाधव, ज्योती शेजवळकर, रूपाली शेजवळकर, कविता साळुंखे, कल्पना गोल्हार, उर्मिला चव्हाण ई. मंडळाच्या पदाधिकारी आणि ईतर सदस्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरस्ता माळतकर आणि सदस्यांनी परीश्रम घेतले.






