Jalgaon

जळगावच्या नागरिकांना सुसज्ज नवे नाना नानी पार्क

जळगावच्या नागरिकांसाठी सुसज्ज नवे नाना नानी पार्कविनोद जाधवजळगांव येथे नागरिकांसाठी दोन कोटी रु खर्च करून सुसज्ज नाना नानी पार्क
साकारण्यात येणार आहे. बुधवारी झालेल्या महासभेत या कामाला मंजुरी देण्यात आली असुन लवकरच कामाला देखील सुरुवात करण्यात येणार आहे. जळगाव शहरात भाऊचे उद्यान, गांधी उद्यान.हे जैन उद्योग समूहाने लोकसहभागातुन तयार केले आहेत.या दोन उद्यानांच्या विकासामुळे जळगाव कराना फिरण्यासाठी उद्यान मिळण्याचे समाधान आहे. त्यात आता रामदास काॅलनी येथील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर दोन कोटी रुपये खर्च करून सुसज्ज असे नाना नानी पार्क उभारले जाणार आहे. या जागेचा गेल्या काही विस ते पंचवीस वर्षां पासून विकास झालेला नव्हता. महापौर भारती सोनवणे, यांनी जागेची माहिती घेवून या जागेचा विकास करण्याचा निर्णय घेतला होता. त्या नुसार या जागेवर दोन कोटी रुपये खर्च करून नाना नानी पार्क साकारण्यात येणार आहे बुधवारी या कामाला मंजुरी देण्यात आली. लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. हि माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली आहे. आणि आराखडा देखील तयार करण्यात आलेला आहे. लोकांना फिरायला हक्कची जागा मिळणार आहे. महापालिकेच्या मोकळ्या जागेला लागुन चारही बाजूने रस्ते आहे.आणि लवकरच उद्यानच्या कामाला सुरुवात होणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button