India

Amazing:सर्व विहिरी गोलच का असतात..?जाणून घ्या कारण..!

Amazing:सर्व विहिरी साधारणपणे गोलच का असतात..?जाणून घ्या कारण..!

कधी ना कधी आपापल्या गावी गेला असाल आणि तिथे विहीर पाहिली असेल. नसेलच तर निदान कुठल्या ना कुठल्या चित्रपटात तरी तुम्ही विहीर पाहिली असेलच. तुम्हीही विहिरीतून पाणी काढले असेल, पण विहिरीचा आकार गोल का असतो, याचा कधी विचार केला आहे का? देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलं तरी विहिरीचा आकार गोलच पहायला मिळतो. चौकोनी विहीर तुम्ही क्वचितच पाहिली असेल, पण बहुतेक विहिरी गोल आकाराच्या असतात.

विहीर म्हणजे काय..?

जमिनीखालील पाणी काढण्यासाठी केलेल्या खड्ड्यावजा बांधकामास विहीर असे म्हणतात.भूपृष्ठाखाली असलेल्या पाण्याच्या पातळीपर्यंत पोहोचून पाणी वापरासाठी उपलब्ध करण्यासाठी ज्या संरचना तयार केल्या जातात त्यापैकी विहीर ही एक सर्वांत जास्त प्रचलित संरचना आहे. विहिरीची रचना साधारणतः वर्तुळाकार असून आड, कूप, गोल विहीर, चौकोनी विहीर, दीर्घिका, नलिका कूप, पुष्करणी, बारव, बुडकी, रींगवेल, विंधन विहीर अशा विविध 11 प्रकारात बांधता येते. आड विहीर अरुंद, चौकोनी आकाराची आणि खोल असते. कूप देखील अरुंद आणि खोल असते परंतू विहिरीचा आकार चौकोनी नसतो. गोल विहीरीचा आकार वर्तुळासारखा आणि चौकोनी विहीरीचा आकार चौकोनी असतो. दीर्घिका ही विहीर लांबट असते. नलिका कूप ही विहीर वापरून खोल पाणी पातळीपर्यंत जाऊन पाणी उपलब्ध करून घेतलेजाते. पुष्करणी ही विहीर चौकोनी आकाराचा, घडवलेल्या दगडांमध्ये पायऱ्या असलेला हा तलावाचा एक लोकप्रिय प्रकार आहे. बारव या विहीरीला उत्तम दगडी बांधकामात पायऱ्या बांधलेल्या असतात. बुडकी या विहिरीला केवळ पावसाळ्यात पाणी असतं आणि नंतर जिवंत झरेनसल्याने ही विहीर कोरडी पडते. विंधन विहीर या प्रकारात योग्य जागा निवडून, यंत्राद्वारेखणून जलधरापर्यंत जाऊन तेथील पाणीसाठा वापरला जातो. रिंगवेल ही लहान व्यास असलेली विहीर कॉंक्रीट रिंगा वापरून केली जाते.

भूपृष्ठाखालील पाणी काढण्यासाठी केलेल्या खड्ड्यावजा बांधकामास विहीर असे म्हणतात.

विहिरींचे प्रकार –
1. आड – जी विहीर अरुंद आणि चौकोनी आकाराच्या विहिरीस आड असे म्हटले जाते.
2. कूप – अरुंद असलेल्या खोल विहिरीला कूप असे म्हणतात.
3. गोल विहीर – या विहिरीचा आकार वर्तुळासारखा असून ही सर्वांत जास्त प्रसार झालेली आणि दिसणारी विहीर आहे.
4. चौकोनी विहीर – या विहिरीचा आकार चौकोनी असतो.
5. दीर्घिका – ही विहीर लांबट असून बाकी सगळी वैशिष्ट्ये गोल विहिरीसारखीच असतात.
6. नलिका कूप – ज्या भागात माती सतत पडत राहिल्याने विहीर खणत जाणे खूप अवघड असते त्या ठिकाणी नलिका वापरून खोल पाणी पातळीपर्यंत जाऊन पाणी उपलब्ध करून घेतले जाते त्यास नलिका कूप असे म्हणतात.
7. पुष्करणी – हा चौकोनी आकाराचा, घडवलेल्या दगडांमध्ये पायऱ्या असलेला तलावाचा एक लोकप्रिय प्रकार आहे.
8. बारव – उत्तम दगडी बांधकामात असलेल्या, मोठ्या पायऱ्या असलेल्या विहीरी म्हणजे बारव होय. यामध्ये जमिनीपासून पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या असतात.
9. बुडकी – ज्या विहिरीला केवळ पावसाळ्यात पाणी असते आणि नंतर जिवंत झरे नसल्याने जी विहीर कोरडी पडते, अशा छोट्या विहिरीला बुडकी असं म्हणतात.
10. विंधन विहीर – जेव्हा भूजल पातळी खोल असते, मातीचा थर कमी असतो आणि कातळ भाग जास्त असतो तिथे योग्य जागा निवडून, यंत्राद्वारेखणून जलधरापर्यंत जाऊन तेथील पाणीसाठा वापरला जातो यास विंधन विहीर असे म्हणतात.
11. रिंगवेल – लहान व्यास असलेली व कॉंक्रीट रिंगा वापरून केलेल्या विहिरीस रिंगवेल म्हणतात.

बहुतेक विहिरी गोल असतात जुन्या प्राचीन काळात विहिरी चौकोनी देखील असत..

कोणतीही गोष्ट करण्यामागे खरं तर विज्ञान कुठे ना कुठे असतेच.या मागेही आहेच.विहीर ही प्रामुख्याने बांधली जाते ती पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी.जुन्या काळात विहीर बांधने म्हणजे फार जिकिरीचा काम असायचं.खोदकाम करायला हातानेच करावा लागायचा .आजच्या आधुनिक काळासारखी ना भूसुरुंग उपलब्ध होते ना अत्याधुनिक मशिनरी.सगळ्या गावाला मिळून एकच विहीर असायची अथवा श्रीमंत व्यक्तींनाच स्वतःच्या वेगळ्या पाण्यासाठी विहीर असायची.या कारणामुळे त्या काळात विहीर प्रामुख्याने चौकोनी आकारात बांधली जायची.आपण अनेक जुन्या विहीर बघू शकता ज्या चोकोनी आकारात उपलब्ध आहेत.

1) परंतु नंतर विहिरींची गरज जशी वाढत गेली त्यानुसार विहीर बांधायची संख्या पण वाढली .वेळ वाचवायचा दृष्टीने गोल विहीर बांधणे हे अधिक सोयीस्कर होऊ लागले आणि मेहनत पण कमी होऊ लागली.

2) चौकोनी विहीर बांधताना ती पडायची शक्यता जास्त असते त्या मानाने गोल विहिरीमध्ये ही शक्यता बरीच कमी असते.या मागचे वैज्ञानिक कारण बघाल तर विहिरीच्या भिंतीवर पाण्याचा पडलेला दाब हा त्याचा मध्यबिंदू(center) कडे वाढत जातो.विहिरीचा आकार गोल असल्यामुळे दाब सर्वत्र समान विभागला जातो.त्यामुळे विहीर पडायची शक्यता पण फार कमी होते.

3) चोकोनी विहीर बांधली असता त्याला आतल्या बाजूने भिंत बांधवी लागायची ज्या कारणामुळे पाण्याचे स्त्रोत (पाझर) हे फक्त खालच्या बाजूलाच खुले असायचे.गोल विहिरीमध्ये असला काहीही करावा लागत नाही.त्यामुळे खर्चाची बचत होते.

गोल विहिरी इतर विहिरींच्या तुलनेत खूप मजबूत

गोलाकार विहिरीला कोपरे नसतात, त्यामुळे विहिरीच्या सर्व बाजूंनी पाण्याचा दाब एकसारखा असतो. दुसरीकडे, जर विहीर चौकोनी आकाराची बनविली असेल, तर फक्त चार कोपऱ्यांवर दबाव असतो. त्यामुळे विहीर जास्त काळ चालू शकणार नाही आणि त्याचबरोबर ती कोसळण्याचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशा स्थितीत विहीर दीर्घकाळ चालावी यासाठी ती गोलाकार करण्यात आली आहे.

माती धसत नाही

विहिरीला गोलाकार बनवण्याचं कारण म्हणजे अनेक वर्ष माती धसत नाही. हे देखील दाबामुळे होतं आणि गोलाकार विहिरी केल्याने माती मुरण्याचा वाव खूप कमी होते.

ड्रिलिंगची सोय

गोल विहीर बनवणं खूप सोपं आहे कारण विहीर ड्रिलिंग करून बनविली जाते. यावेळी जर तुम्ही गोल आकारात खोदलं तर ते सोपं होतं. जर तुम्ही चौकोनी आकाराची विहीर खोदण्याबद्दल बोललो तर ते खूप कठीण होतं. ज्यामुळे विहीर फक्त गोल आकारात खोदली जाते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button