Chalisgaon

गांज्याची केस दाखल न करणे बाबत लाच प्रकरण

गांज्याची केस दाखल न करणे बाबत लाच प्रकरण

चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले

लाचेची मागणी अहवाल

▶️ *युनिट -* जळगाव.
▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय-30 ता.चाळीसगाव, जि.जळगाव.
▶️ *आरोपी -*
1) स.फौ.ब.नं.1973 बापुराव फकीरा भोसले, वय- 52 वर्षे, नेमणुक-चाळीसगाव शहर पो.स्टे.वर्ग 3 रा:- आमडदे, ता.भडगाव. ह.मु.नं-९, कल्पतरू हॉस्पिटलजवळ, भडगाव रोड,चाळीसगाव,ता.चाळीसगाव, जि.जळगाव.

2) पो.कॉ.ब.नं.3131 गोपाल गोरख बेलदार, वय-31 वर्षे, नेमणुक-चाळीसगाव शहर पो.स्टे.वर्ग-3, रा:- शेंदुर्णी दवाखान्यामागे, प्रभुकृष्ण नगर, शेंदुर्णी,ता.जामनेर. ह.मु.शाहु नगर,भडगाव रोड,चाळीसगाव, जि.जळगाव.
▶️ लाचेची मागणी- 10,000/-₹ तडजोडीअंती 8,000/-₹
▶️ लाचेची मागणी ता. – ता.04/05/2020 व ता.05/05/2020.
▶️ लाचेचे कारण- यातील तक्रारदार यांच्याकडे कामावर असलेल्या इसमावरती गांज्याची केस दाखल न करण्याची सबब करुन त्यामोबदल्यात यातील आरोपी क्रं.1 व 2 यांनी दिनांक 04/05/2020 व 05/05/2020 रोजी दोन्ही आरोपींनी तक्रारदार यांच्या मार्फतीने पंचासमक्ष 10,000/-₹ लाचेची मागणी करून तडजोडीअंती 8,000/-₹ लाचेची मागणी केली म्हणुन गुन्हा.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
▶️ सापळा अधिकारी- गोपाल ठाकुर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, जळगांव.
▶ सापळा पथक- Dy.S.P.गोपाल ठाकुर, PI. निलेश लोधी, PI. संजोग बच्छाव, सफौ.रविंद्र माळी,पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.सुरेश पाटील, पोना.मनोज जोशी, पोकॉ.प्रविण पाटील,पोकॉ.नासिर देशमुख,पोकॉ.ईश्वर धनगर.

▶️ तपास अधिकारी-
संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि.जळगांव.
▶ मार्गदर्शक-1) मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
2) मा.श्री. निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
▶ आरोपीचे सक्षम अधिकारी- मा.पोलीस अधिक्षक सो,जळगाव.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button