Nagpur

मासिक हप्त्यांमध्ये दोन महिन्यांची सूट द्या  ओला-उबर चालकांची मागणी

मासिक हप्त्यांमध्ये दोन महिन्यांची सूट द्या

ओला-उबर चालकांची मागणी

राजेश सोनुने

नागपूर – कोरोनाच्या दहशतीमुळे गेल्या दहा दिवसांपासून प्रवाशीच भेटत नाही. गाड्या बुक करण्याचे प्रमाण प्रचंड घसरले आहे. प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय ठप्प पडला आहे. आम्ही आमची वाहने कर्ज घेऊन विकत घेतली आहे. आता मासिक हप्त्यांसाठी बॅंक तगादा लावतील. त्यामुळे पुढील दोन महिने तरी बॅंकांनी मासिक हप्त्यांमध्ये सुट द्यावी, अशी मागणी ओला-उबेर चालकांनी केली आहे.

कोरोनाच्या दहशतीमुळे सर्व व्यवसार ठप्प झालेले आहेत. प्रवाशांची ये-जा मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. खबदरारीचा उपाय म्हणून लोक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे ओला, उबेर आदी प्रवाशी वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. नागपूर शहरातील ओलाचालक दीपक साने यांनी तक्रार दिली. ते म्हणाले, प्रवाशांची ने-आण करणे ही आमची एकप्रकारे सेवाच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसांत कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करु नये, असे आवाहन केले आहे. हाच निमय आम्हालाही लागू होतो. दहा ते 12 तास वाट पाहून प्रवाशीच मिळत नाहीत. एका दिवसाच्या कमाईत घट होऊन केवळ 100 रुपयापर्यंत कमाई होते. एवढ्यात खाणार काय आणि बॅंकांचे हप्ते देणार काय. हीच परिस्थिती पुढील अनेक दिवस असेल. त्यामुळे परिस्थिती निवळेपर्यंत आणि जनजीवन सुरळीत येईपर्यंत बॅंकांनी मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे इएमआय वसुल करु नये. त्यावर व्याज आकारू नये व कर्जफेडीच्या एकूण कालावधीत पुढे दोन महिने जोडावे, अशी मागणीही दीपक साने यांनी केली. ओला-उबेर चालक राजू बालपांडे, विजय काटोले, आकाश मून, नीलेश गाडगे, सुदर्शन सवाईकर, सचिन पेटकर, आनंद डेहरिया, निशांत अली, रमेश गुप्ता, जोसेफ सोलोमन, किशोर मेश्राम, आकाश नागदिवे, विजय राजपूत, सागर डेकाटे, अश्विन बडगे, रवी बोरकर यांनीही अशीच मागणी केली आहे. कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याबाबत प्रवासी वाहतूकीच्या कंपन्यांनी सरकारसोबत बोलावे, अशी मागणही चालकांनी केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button