Maharashtra

शिवसेना माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या आवाहनास प्रचंड प्रतिसाद

शिवसेना माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या आवाहनास प्रचंड प्रतिसाद

परंडात १७५ बॅगचे संकलन

प्रतिनिधी सुरेश बागडे

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लोकांना घराबाहेर निघणे अशक्य झाले असून, देशांत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना रक्तदान करण्याबात विनंती केली होती. परंडा मध्ये मा.आमदार ज्ञानेश्वर पाटील मित्र मंडळ व परंडा युवासेना च्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीर आयोजीत करत युवकांना आवाहन केले होते. यास युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १७५ बॅगचे संकलन करण्यात आले.

परंडा शहरातील विश्वसिध्दी कॉम्लेक्समध्ये या शिबीराच आयोजीन करण्यात आले होते. सोशल डिस्टिंगच तंतोतंत पालन करण्यात आले होते.यात १७५ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला. संपुर्ण राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा असून ग्रामीण भागातही काही वेगळी परिस्थिती नाही. या तुटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे शिवसेना पक्ष प्रमुख ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्राला रक्तदान करून ही तूट भरून काढण्याचे आव्हान काही दिवसांपूर्वीच केले, व यातून सर्वत्रच सूज्ञ नागरिक रक्तदान देखील करत आहेत. विविध ठिकाणी विविध संस्था, संघटना यांच्यावतीने रक्तदान शिबिरे घेण्यात येत आहेत.

नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर, हिरहिरीने भाग घेणारे मा.आमदार ज्ञानेश्वर पाटील मित्र मंडळ व परंडा युवासेना यांनी आयोजित केलेले रक्तदान शिबिर आज परंडा शहरामधील विश्वसिध्दी कॉम्लेक्स येथे संपन्न झाले. यात संकलन करण्यात आलेल्या बॅग महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी गरज असेन तिथे पाठविण्यात येणार असून रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना भविष्यात कधीही रक्ताची गरज पडली तर ते त्यांना या रक्तपेढी मार्फ़त मोफत मिळणार असल्याची माहिती शिवसेना माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील दिली.

यावेळी शिवसेना माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जयकुमार जैन मालक, जि प सदस्य सौ कांचनताई संघवे, ( शिराढोण ) युवा ऱ्हदयसम्राट रणजित ज्ञानेश्वर पाटील, नगरसेवक ईस्माईल कुरेशी, नगरसेवक मकरंद जोशी, नगरसेवक आब्बास मुजावर, भाजपा अॅड. जहीर चौधरी, समीर पठाण,विनोद साळवे, दत्ता मेहेर, संतोष गायकवाड , प्रशांत गायकवाड, धिरज हिवरे, वैभव सांगडे किरण शिंदे, आकाश सुर्यवंशी, मयुर शहाणे,अरूप अजय कुमार आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button