मनमोहक चित्र वरली आर्टने शाळा फुलली
महेश हुलसूरकर कर्नाटक
कर्नाटक : हुलसूर येथील श्री विरभद्रेश्वर हायस्कूल मध्ये शाळेचे चित्रकलेची शिक्षक अंजाप्पा कुंभार सर व शाळेतील आठवी व नवी मधील विद्यार्थी व विद्यार्थीनी मिळुन जुन्या काळातील जुन्या आठवणी ताज्या करीत सुमारे दोन महिन्यापासून शाळेत प्रवेश द्वार पासून ते सर्व शाळेच्या भिंतीवर जुन्या काळातील मनमोहक चित्र वरली आर्ट हे प्रक्षिशन घेत विविध शेतात काम करणारे, हाती, घोडे, महाद्वार, झाडे,रांगोळी असे चित्र साकारीत चित्रकलेची आवड निर्माण होत आहे व शाळेतील चित्रकला पाहून विद्यार्थांची ही उपस्थित चांगली दिसत आहे.
चित्रकला शिक्षक अंजाप्पा कुंभार जुन्या काळातील लोक हे घरावरती चुना गेरूने डोळ्यासमोरी द्रष पाहून रंगरंगोटी करीत असत पण आता सर्व हे वरली आर्ट चे विसर पडलेले मिळत आहे व ही कला एक अविस्मरणीय अनुभव आहे की ही कला पाहून कौतुकाने लोक आता पाहत आहेत सर्व सरकारी कचेरीत ही कला साकारत आहे व विद्यार्थी ही पद्धत लवकरात लवकर शिकत आहेत कलरवरती पुर्ण खर्च शाळेचे मँनेजमेंट देत आहे व यामध्ये प्रामुख्याने मुख्याध्यापक व सहशिक्षकांचा या मध्ये सात आहे त्यामुळे लाँक डाउन मुळे विद्यार्थ्यांना ही आँनलाईन याची माहिती मिळत गेली आता शाळेत चित्रकला काढण्याची मजा विद्यार्थी घेत होते.
जुन्या काळातील जुन्या आठवणी ताज्या झाल्याने व शाळेलाही रंगरंगोटी झाली व त्यातच विद्यार्थी ही ही कला शिकण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थी बोलत होते.






