sawada

सावदा येथे उच्च दाब वीज तारांचे शाॅक लागल्याने कामगार जखमी

सावदा येथे उच्च दाब वीज तारांचे शाॅक लागल्याने कामगार जखमी

सावदा युसूफ शाह

सावदा ता रावेर जि जळगाव येथे कोचुर रसत्या लगत विषणु हरी प्लाॅट मध्ये नवीन घराच्या परदी बांधकाम करता वेळी किमान तीन फुटाच्या अंतरावर असलेल्या उच्च दाबाचे वीज ताराला एका कामगाआर मिस्त्री चा हातात असलेली लोखंडी असारी टच झाल्या मुळे शाक लागले असता कामगार पालक वरून खाली पडल्या ने त्याच्या डोक्याला जबर मार लागल्या ची घडना घडली . वीजेचा शाक इतका जबरदस्त होता कि मजुराची पॅन्ट ने भडका घेतल्या ने त्याचे दोन्ही पाय सुध्दा जाळले.
घटना स्थळावरून त्याचे सोबत असलेले सहकारी मजुरांनी त्याला उपचारासाठी डाॅ वारके यांचे दवाखान्यात दाखल केले.

सविस्तर वृत्त असे कि सावदा येथे कोचुर रसत्या लगत विषणु हरी प्लाॅट मध्ये सिध्दांत चौधरी यांचे नवीन घराचे बांधकाम सुरू असतांना त्या ठिकाणी घराची परदी बाधंणी करण्या चे काम शेख सलीम शेख इब्राहिम रागवत बाजार सावदा हा कामगार मजुरी करत असतांना किमान तीन फुटाच्या अंतरावर असलेल्या वीज तारास लोखंडी असारी टच झाल्या मुळे त्यास जोरास शाक लागल्या मुळे तो घराच्या पालका वरून खाली पडल्या ची घटना दि.08/09/2020 रोजी दुपारी 5 वाजेच्या सुमारे घडलेली आहे.

डोकं व दोन्ही पायावर मोठी दुखापत झाली आहे.
घटना स्थळ वरून मिस्त्री कामगार शेख जावीद , शेख रफीक , राजू मिस्त्री , यांनी त्याला वेळे वर उपचार मिळावा या साठी मेहनत घेतली. सुदैवाने जीवित हानी टळलेली आहे. सदरील कामगार शेख सलीम शेख इब्राहिम हा नोंदणी कृत लाभार्थी कामगार असल्याची नोंद कामगार आयुक्त कार्यालय जळगांव येथे नोंद केल्याचे सांगण्यात आले. शासना कडून सुरू असलेल्या कामगार योजने चा लाभ त्याला मिळावा अशी अपेक्षा त्याच्या कुटुंबा कडुन केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button