Maharashtra

लातूरचे गीतकार डॉ संदीप जगदाळे यांची लोकगीतातून कोरोनाविषयी जनजागृती

लातूरचे गीतकार डॉ संदीप जगदाळे यांची लोकगीतातून कोरोनाविषयी जनजागृती

लातूर प्रतिनिधी:-प्रशांत नेटके

ठोस प्रहार वृत्तसेवा:- जगभरात कोरोना या विषाणूजन्य रोगाने थैमान घातले असून.दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशा या प्रतिकूल परिस्थितीत कोरोनाबद्दलची लोकांमध्ये जनजागृती व्हावी व प्रबोधन व्हावे यासाठी दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालयातील संगीत विभागाच्या कलावंतांनी एक लोकगीत सादर केले आहे. ”लोकहो बसा तुम्ही आपल्या घरी,नाहीतर जाचाल यमाच्या दारी” अशा बोलाचे हे लोकगीत सध्या सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेत आहे.
या गीताचे गायक व गीतकार डॉ संदीप जगदाळे यांनी या लोकगीतातून कोरोनाची लक्षणे,त्यापासून सुरक्षित रहाण्यासाठी हात धुण्यासाठी सॅनेटायझरचा वापर करावा,श्वसनाचे शिष्टाचार,फिजिकल डिस्टन्स इ. नियमांचे पालन कटाक्षाने करावे.धार्मिक व प्रार्थना स्थळी गर्दी करू नये,सार्वजनिक समारंभाचे आयोजन न करता घरच्याघरी अशा समारंभांचे आयोजन करावे असा महत्वपूर्ण संदेश या गाण्यातून देण्यात आला आहे.तसेच लॉकडाऊन काळात वाचन-लेखन व योग-प्राणायाम करून मानसिकदृष्ट्या सशक्त होण्यासाठी समुपदेशन केले आहे.डॉक्टर,नर्स,आरोग्य कर्मचारी,पोलीस बांधव,शासकीय यंत्रणा,सफाई कामगार,अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असाही संदेश त्यांनी दिला आहे.डॉ जगदाळे यांनी यापूर्वी पोवाड्याच्या माध्यमातून कोविड-१९ विषयी जनजागृती केली आहे.त्यानंतर आता ते लोकगीताच्या माध्यमातून कोरोना विषयी प्रबोधन करीत आहेत.
या लोकगीताला गायनाची साथ प्रा. शरद पाडे,कु.स्वरांजली पांचाळ,कु.प्रियंका बनसोडे,ज्योतिबा बडे,सचिन जाधव यांनी केली आहे.तर ढोलकीची साथ सुरज साबळे,बँजो साथ वाल्मिक बनसोडे,ऑक्टोपॅड साथ उमेश टेकाळे,ड्रमसेट साथ प्रथमेश सूर्यवंशी यांनी केली आहे.ध्वनीमुद्रण डी शार्प स्टुडियोचे मिलिंद धनेगावकर यांनी तर चित्रीकरण व मिश्रण साईकेदार बोधनकर यांनी केले आहे. प्रा.इरफान शेख यांनी तांत्रिक सहाय्य केले आहे.
माजी विद्यार्थी संघांच्या वतीने हे दुसरं समाज जागृती चे लोकगीत दयानंद कला महाविद्यालयाने तयार केले आहे.यापूर्वी एक टप्पा आऊट फेम बालाजी सूळ यांच्या भारूडातून प्रबोधन केले आहे. अशा प्रबोधनाची संकल्पना दयानंद कला महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांची आहे.या स्तुत्य उपक्रमाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री लक्ष्मीरमणजी लाहोटी,सरचिटणीस श्री रमेशजी बियाणी,संयुक्त सचिव श्री सुरेशजी जैन,उपप्राचार्य अनिलकुमार माळी,पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे,माजी विद्यार्थी संघाच्या प्रभारी डाॅ सुनिता सांगोले,डाॅ वामनराव पाटील,ॲड मधुकर गिरी,डॉ देवेंद्र कुलकर्णी,अधीक्षक नवनाथ भालेराव यांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button