भ्रष्टाचार….
यशस्वी सापळा
मत्स्य पालन व्यवसायाला मिळणारे सरकारी अनुदान मिळवुन देण्यासाठीच्या कागदपत्रांची पुर्तता करून देण्यासाठी लाच घेतल्या प्रकरणी दोन अधिकाऱयांवर गुन्हा दाखल….
जळगाव.प्रतिनिधी सुरेश कोळी
तक्रारदार- पुरुष,वय-37
रा.जळगाव,ता.जि.जळगाव.
आरोपी-१) श्री.रमेशकुमार जगनाथ धडील, वय- 55 वर्षे, व्यवसाय-नोकरी, प्रभारी सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय,कार्यालय,जळगाव.
रा- मुकूंद अपार्टमेंट,फ्लॅट नं.6, शिखरेवाडी,नाशिक. ता.जि.नाशिक. वर्ग-2.
२) रणजीत हरी नाईक, वय-49, व्यवसाय-नोकरी, कनिष्ठ लिपीक, सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय कार्यालय,जळगाव रा.प्लॉट नं.29, रायसोनी नगर,जळगाव.वर्ग-3
लाचेची मागणी- 10,000/-₹ लाच स्विकारली-10,000/₹
हस्तगत रक्कम- 10,000/-रु
लाचेची मागणी – ता.24/09/2019
लाच स्विकारली – ता. 25/09/2019
लाचेचे कारण –
तक्रारदार यांचा मत्स्य व्यवसाय असुन त्यांनी वाघुर धरणावर पिंजरा पद्धतीने मत्स्य पालनाचे कंत्राट घेतलेले आहे सदर मत्स्य पालन व्यवसायाला मिळणारे सरकारी अनुदान मिळवुन देण्यासाठीच्या कागदपत्रांची पुर्तता करून घेवून उत्कृष्ट अहवाल देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आरोपी लोकसेवक यांनी दि.24/09/2019 रोजी पंचासमक्ष 10,000/-₹ लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम आरोपी क्रं.1 यांनी आज दि.25/09/2019 रोजी पंचासमक्ष स्वीकारली.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
मार्गदर्शन : 1) मा.सुनिल कडासने साो., पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक
2) मा. निलेश सोनवणे साो., अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक
सापळा पथक – जी.एम.ठाकुर,पोलीस उप अधिक्षक,निलेश लोधी,पोलीस निरीक्षक, संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक,पोहेकॉ.सुरेश पाटील, पोना.मनोज जोशी,पोकॉ.प्रशांत ठाकुर, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ. नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, ला. प्र. वि. जळगाव.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी – मा.सचिव (पदुम),कृषी व पदुम विभाग,महाराष्ट्र शासन मंत्रालय,मुंबई.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव अल्पबचत भवन,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,जळगाव