चाळीसगाव प्रतिनिधी नितीन माळे
सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण आयोजित हरतालिका पूजन सोहळ्याला सिताराम पहेलवान मळा येथे महिलांनी प्रचंड उत्साहात सहभाग घेतला. हरतालिका हा महिलांसाठी अत्यंत पवित्र व महत्त्वाचा सण मानला जातो. शिव शंकर व पार्वती मातेच्या नात्याचा, समर्पणाचा व प्रेमाचा हा सण असतो.
शिव शंकर व पार्वती या भारतातील सर्वोत्तम दैवतांना नमन करण्यासाठी सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण आयोजित सामूहिक हरतालिका पूजनासाठी तालुक्यातील 2000 महिलांनी सहभाग घेतला. या सामूहिक हरतालिका पूजन सोहळ्यासाठी आलेल्या प्रत्येक महिलेची सौ. प्रतिभाताईंनी ओटी भरली व प्रत्येक महिलेला राजगिऱ्याच्या लाडूचे पाकिट व केळी देण्यात आली. ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारामध्ये शिवशंकरांची व पार्वती मातेची पूजा करण्यात आली.
या हरतालिका पूजनाच्या वेळी महिला भजनी मंडळांनी सुंदर भजने व भावगीते सादर केली.
या हरतालिका पूजन सोहळ्याला मंगेश चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली.
हरतालिका पूजन करून महिलांनी शिव शंकर व पार्वती मातेचे आशीर्वाद घेतले.तसेच सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्याच्या दुष्काळमुक्तीचे साकडे घातले.







