Chandrapur

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठारकोलरा गावालागत शेत शिवारातील घटना

चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

चिमूर तालुल्यातील कोलारा गावातील बालाजी वाघमारे वय 50 यास काल रात्री 8 वाजताच्या सुमारास आपल्या शेतात पिकाची जागली करण्यास जात असतांना दबा धरून बसलेला वाघाने हला करून ठार केले व फरकटत नेऊन त्याला झुडूपात नेऊन ठेवले.

गावातील नागरिकांना घटनेची माहिती आज सकाळी मिळताच घटनांकडे धाव घेतली.या घटने मुळे कोलारा गावातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व शासनाकडून त्याच्या कुठुबातील व्यक्तीला आर्थिक मदत करावी व वाघाचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे या घटनेची तपास पोलीस निरीक्षक स्वपनील धुळे व वन विभाग करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button