Chimur

चिमुर येथे शिवजयंती निमित्य भव्य शोभायात्रा .. जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषणी दुमदुमली चिमुर नगरी

चिमुर येथे शिवजयंती निमित्य भव्य शोभायात्रा,,,,
= जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषणी दुमदुमली चिमुर नगरी,

चिमुर:- ज्ञानेश्वर जुमनाके

हिंदवी स्वराज्याचे स्वंस्थापक, रयतेचे राजे छत्रपति शिवाजी महाराजांची भव्य शोभायात्राचे आयोजन चिमुर तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते.
चिमुर शहरातील वडाळा येथून छत्रपति शिवाजी महाराज यांच्या भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख धर्मसिंग वर्मा यानी महाराजांच्या फ़ोटोचे पूजन करून शोभा यात्रेला सुरुवात झाली, शोभायात्रे मध्य आबाल वृद्धा सह युवक मंडळी मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती.

जय भवानी जय शिवाजी च्या जय घोषानी चिमुर नगरी दुमदुमली होती, शिवाजी महाराजांच्या रथ व घोड्यावर बाल शिवाजीच्या वेशातील वीरेंद्र वर्मा शोभा यात्रेचे विशेष आकर्षन ठरले होते, वड़ाळा येथून निघालेली शोभायात्रा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मार्गनि संताजी चौक कावरे चौकातुन शिवाजी चौकामधे आगमन झाले, छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतल्याचे शिवाजी चौकात पूजन करण्यात आले, त्यानंतर रायपूरक चौक मधून शोभायात्रा मार्गकर्मण करीत हुतात्मा स्मारक येथे संम्पन झाली.

त्यानंतर कार्यक्रमात छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जीवनशैली वर प्राध्यापक दीपक जागृत अमरावती व एडव्होकेट अनंता सर् यांचे मार्गदर्शन झाले, कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी उपजिल्हाप्रमुख धर्मसिंह वर्मा तर संचालन देवीदास गिरडे यानि केले, कार्यक्रमच्या यशवीतेसाठी मनोज तिजारे, संदीप कावरे, विजय गोठे, केवलसिंग जूनि, विशाल बोकडे, सूरज डुकसे, प्रशांत पेंदाम, व सर्व पदाधीकार्याणि परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button