चंद्रपूर

पिटीचुवा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी .

पिटीचुवा येथे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी .

पिटीचुवा गावाला आदर्श करणार ..राका विधानसभा अध्यक्ष सुरेश रामगुंडे ..

चिमूर प्रतिनिधी
वंदनीय ब्रम्हलीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी पिटीचुवा येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष चिमूर विधानसभा अध्यक्ष सुरेश रामगुंडे यांनी सांगितले की शेतकरी संकटात सापडला आहे पण शासनकर्ते सरकार स्थापन करण्यात मग्न आहेत .माझं जन्मगाव पिटीचुवा असून अनोळखी असलेले गाव असून पूर्ण देशभर पिटीचुवा गावाचा नाव रोशन मेघा रामगुंडे करीत आहे . जीवनात यशस्वी होण्यासाठी दूरदृष्टी समोरची ठेवणे आवश्यक आहे . गावाच्या विकास व एकोप्यासाठी एकत्रित असणे आवश्यक आहे येणाऱ्या काळात पिटीचुवा ला आदर्श बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत गावातील होतकरू विद्यार्थ्यांना सहकार्य करणार असल्याचे सांगितले
पुण्यतिथी कार्यक्रमात लांजेवार महाराज ,झाडे महाराज ,राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष चिमूर तालुका अध्यक्ष योगेश ठुने, कांग्रेस चे किशोर शिंगरे ,बालाजी कोयचाडे, नामदेव डोये माजी पोलीस अधिकारी विजय बारापात्रे सौ अनिता रामगुंडे सौ शिंगरे सुखदेव रामगुंडे आदी उपस्थित होते
00 किशोर सिंगरे म्हणाले की राष्ट्रसंताचे विचार ज्या ज्या गावात आचरण केले जाते तो गाव आदर्श बनले आहे .गुरुदेवांच्या विचाराने एकमेकांच्या कार्यक्रमात जाऊन आचार विचार होत आहे .भजनातून ज्ञान मिळते त्यामुळे प्रगतीकडे वाटचाल जीवनात होत असते राष्ट्रसंताची शिकवण आचरण करण्याची गरज असल्याचे सांगितले 00
00 सुरेश रामगुंडे परिवार कडून उत्कृष्ट स्वच्छता केल्याबद्दल रमेश बावणे व आदी ना पारितोषिक प्रदान करण्यात आले 00
संचालन खुशाल आवारी यांनी केले
गुरुदेव सेवा मंडळ पिटीचुवा गुरुदेव सेवकांनी पुण्यतिथी कार्यक्रम यशस्वी केला……

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button