अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील गोरे मंगल कार्यालयात झालेल्या जनशक्ती विकास आघाडीच्या मेळावा संपन्न ..
अहमदनगर प्रतिनिधी सुनिल नजन
जिल्ह्यातील पाथर्डी येथील गोरे मंगल कार्यालयात झालेल्या जनशक्ती विकास आघाडीच्या मेळाव्यात विद्यमान लोकप्रतिनिधीवर जोरदार टीकाश्र सोडत सभा गाजवली.या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी डॉ शिवाजीराव चोरमले होते. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सौ हर्षदाताई काकडे,अँड शिवाजीराव काकडे यांनी गेल्या पाच वर्षात भाजपच्या गोटात राहून कशी फरफट झाली याची संपूर्ण माहिती सर्व सामान्य जनतेला दिली. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करावी कि नाही याबाबत मते जाणून घेण्यासाठी लोकांना बोलते केलेअसता सामांन्य लोकांनी आपल्या व्यथा मांडत कोणत्याही पक्षात जा पण निवडणूक लढवा असा संदेश दिला. या वेळी जगन्नाथ गावडे,दिगंबर सोलाट, गोविंद दातिर,काँ.रामभाऊ दातिर, अशोक दातिर, राजाभाऊ फलके,भाऊसाहेब सातपुते,प्राचार्य फसलेसर,नेहुल सर,प्रशांत रक्ताटे,ताराचंद कांबळे,किसन कंठाळी,बाजीराव कीर्तने,संजय चितळे,दामू काकडे,रामकृष्ण भिसे,सुरेश मिसाळ,विष्णु सातपुते, सुभाष कचरे,यांच्या सह पाथर्डी तालुक्यातील अनेक नेते उपस्थित होते. आभार संजय आंधळे यांनी मानले.







