Life Style

विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवून त्यांची एक वर्षाची फी सरसकट माफ करावी. भिम आर्मीचे राज्यशासनाला साकडे

विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवून
त्यांची एक वर्षाची फी सरसकट माफ करावी. भिम आर्मीचे राज्यशासनाला साकडे

महाराष्ट्राचे उच्चतंत्र शिक्षणमंत्री मा.ना.उदय सामंत यांना भिम आर्मीचे जाहीर निवेदन

लक्ष्मण कांबळे

अंतिम वर्षासह सर्वच परीक्षा रद्द करून मागील सेमिस्टरच्या सरासरीनुसार विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात यावे , त्यासाठी राज्यशासनाने अधिकृत आदेश जारी करावेत.तसेच नवीन वर्ष प्रक्रिया सुरू करीत असताना कोविड-१९ मुळे सर्वसामान्य गोरगरिबांच्या झालेल्या आर्थिक हानीचा विचार करता , त्या विद्यार्थ्यांची किमान एक वर्षाची फी सरसकट माफ करण्यात यावी. इतकेच नव्हे तर प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात कुठल्याही आदेशाविना अनेक कॉलेजांकडून प्रोविजनल ऍडमिशनच्या नावाखाली विद्यार्थ्यांची भरमसाठ आर्थिक लूट करण्यात येत असून अश्या महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि कोरोना कालावधीत *विद्यार्थ्यांना सुरळीत शिक्षण मिळावे ह्यासाठी COURSE INBUILT असणारे TABLET उपलब्ध करून द्यावे जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही अश्या विविध मागण्यांचे निवेदन घेऊन भिम आर्मीचे शिष्टमंडळ केंद्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच मंत्रालयात उच्चतंत्र शिक्षणमंत्री मा.ना.उदय सामंत यांस भेटल्याची माहिती भिम आर्मीचे महाराष्ट्र राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
भिम आर्मीच्या ह्या निवेदनावर सहानुभूतीपूर्ण गंभीरपणे चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मा.ना.उदय सामंत यांनी भिम आर्मीच्या शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती सुद्धा भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे.
सदरहू शिष्टमंडळात केंद्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे यांच्यासह भिम आर्मीचे महाराष्ट्र राज्याचे कोअर कमिटी प्रमुख मा.राजुभाई झनके तसेच *मुंबईचे उपाध्यक्ष अविनाशजी गरुड , संतोषजी गायकवाड आणि ज्येष्ठ पत्रकार तानाजीराव कांबळे उपस्थित असल्याची माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Back to top button