धक्कादायक: अल्पवयीन बहिणीवरच केला सतत बलात्कार..!गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस..
बीड मध्ये बहिणीवरच अनेक दिवस भावा नीच बलात्कार केल्याची घटना घडली आहे.यामुळे परिसरात खळबळ उडाली असून गेल्या काही दिवसात ही दुसरी घटना आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की बीड पोलीस स्टेशन हद्दीतील एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तिच्या सख्ख्या भावाने आणि चुलत भावाने वारवांर बलात्कार केल्याची आणि त्यातून ती गरोदर राहिली. भावांनी आपल्या रक्त्याच्या नात्याला काळिमा फासत आपल्या बहिणीवर अत्याचार केला आहे. संबंधित आरोपी भाऊ बऱ्याच दिवसांपासून आपल्या बहिणीचं लैंगिक शोषण करत होते.
पीडित मुलीचं पोट दुखू लागल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, यावेळी पीडित मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या सख्ख्या भावासह चुलत भावा विरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.ही १६ वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी आपले आई वडील आणि भावासोबत बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. १७ वर्षीय सख्खा भाऊ आणि १५ वर्षीय चुलत भाऊ मागील बऱ्याच दिवसांपासून पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होते.या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रत खळबळ उडाली आहे.






