सौ.प्रतिभा मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गणेशपूर येथे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न
२५० हून अधिक रुग्णांची तपासणी, ३७ रुग्णांच्या होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया…
मनोज भोसले
आमदार मंगेश चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले. सौ.प्रतिभा मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित या शिबिरात जवळपास २५० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३७ रुग्णांना मोतीबिंदू निघाल्याने त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी नंदुरबार येथे रवाना करण्यात आले. गणेशपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित या शिबिराची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन आमदार मंगेश चव्हाण व सौ प्रतिभा चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी पं.स. उपसभापती बाळासाहेब राउत, सरपंच सत्यभामाताई सोनवणे, उपसरपंच कल्पनाताई गुलाब पाटील, सदस्य दशरथ शेलार, सदस्या सुनीता राजू पाटील, पोलीस पाटील भागवत पाटील,भाजपचे प्रदीप पाटील, राजू कुलकर्णी, कावेरीताई पाटील, योजनाताई पाटील, सोनलताई वाघ, चितेगाव येथील निवृत्ती कवडे, पंकज पाटील, तांबोळे येथील संदीप पाटील व जितेंद्र पाटील, शामवाडी येथील भूषण पाटील, गणेशपूर येथील संजय हजारे, ओढरे रवी पाटील, प्रदीप देसले सर, किशोर पाटील, तुषार देसले आदी उपस्थित होते.
या शिबिरासाठी कांतालक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय नंदुरबार येथील डॉ.प्रकाश कोळी व डॉ.शाम सूर्यवंशी व पथक नेत्र तपासणी साठी उपस्थित होते तर शिबीर यशस्वीतेसाठी आमदार चव्हाण मित्र परिवार व निलवर्षा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गणेशपूर यांच्या पदाधिकारी – सदस्यांनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन गणेश निकम यांनी केले.
#मोफत_शिबीर
#नेत्र_तपासणी #ममोतिबिंदू_शस्त्रक्रिया
#आमदार_मंगेश_चव्हाण_मित्र_परिवार






