रावेर

सोशल मिडीया च्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकुर टाळा…

सोशल मिडीया च्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकुर टाळा…
स.पो नि राहुल वाघ यांचे व्हाटस्अप ग्रुप अडमिन यांना आवहान…

मोठा वाघोदा .ता.रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी

राज्यात विधान सभा निवडणूक प्रक्रिया सुरु आहे त्यानिमित्ताने राज्यभर आदर्श आचासंहिता निवडणूक आयोगाने लागू केली आहे त्याच पार्वभुमीवर व्हाटस्अप ग्रुपच्या माध्यमातून अफवा तथा राजकीय आक्षेपार्ह मजकुर जेणे करुन धार्मिक तथा राजकीय व्यक्ती च्या भावना दुखावल्या जाऊ शकतात त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक व्हाटस्अप ग्रुप अडमिन ने या गोष्टी कडे गंभिर तेने लक्ष देणे गरजेचे आहे असे कोणत्याही ग्रुप मधे आढळल्यास
सी आर पी सी १४९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम ६८ अन्वये
व्हॉटसअप ग्रुप अॅडमीन यांना सुचीत करण्यात येते की आपण कोणत्याही व्हॉटसअप ग्रुपचे
अॅडमीन असाल तर आपण आपले व्हॉटसअप ग्रुप मध्ये कोणकोणत्या व्यक्तीना संमाविष्ठ करु शकता पण
या बाबत आपणास सर्व अधिकार असुन सुद्धा सदर व्हॉटसअप ग्रुप मध्ये कोणकोणते संदेश येतात किवा
पाठविले जातात या बाबत आपणास पुर्ण कल्पना असणे अनिवार्य आहे
सद्या राज्यात विधानसभा निवडणुक निमीत्ताने राज्यात आदर्श आचार संहीता लागु असुन सद्या राजकीय
पक्षावर किवा वैयक्तीक टिका टिप्पणी हे व्हॉटसअप ग्रुप किवा सोशल मिडीयाचे मार्फत मोठ्या
प्रमाण चालु असल्याचे आमच्या निर्दशनास आलेले असुन आपण आपले व्हॉटसअप ग्रुप मध्ये
राजकीय वैयक्तीक टिका टिप्पणी करु नये या बाबत आपले व्हॉटसअप ग्रुप मधील सर्व संदस्याना
पुर्व सुचना द्याव्यात सदर टिका टिप्पणी ही आपले व्हॉटसअप ग्रुप मध्ये झाली व आपण सदर
ग्रुपचे अॅडमीन असल्याचे आमचे निदर्शनास आले व त्यामुळे जर कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न
निर्माण झाल्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल व आपणा विरुद्द प्रचलीत
कायदयान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
व आपले विरुध्द गुन्हा दाखल केला जाईल यांची नोंद घ्यावी असे आवाहन सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.राहुल वाघ यांनी केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button