Chalisgaon

? ब्रेकींग न्युज… चाळीसगाव तालुक्याला  लवकरच 1 हजार  टन युरिया मिळण्याची शक्यता…….

? ब्रेकींग न्युज…

चाळीसगाव तालुक्याला लवकरच 1 हजार टन युरिया मिळण्याची शक्यता…….

कॉम्प्लेक्स खते देखील उपलब्ध होण्याची शक्यता……

शेतकऱ्यांनी दुकानदारांच्या संपर्कात राहावे ……

चाळीसगाव प्रतिनिधी- मनोज भोसले

चाळीसगाव शहरासह तालुकाभरातील जवळपास 15 होलसेल व किरकोळ कृषी दुकानांवर काल जवळपास 120 टन युरिया वाटप झाला मात्र तालुक्याचे एकूण क्षेत्र पाहता जवळपास 11 हजार टन युरियाची आवश्यकता तालुक्याला होती व आजपर्यंत जवळपास 50% म्हणजे च 5 हजार टन युरिया तालुक्याला उपलब्ध झाल्याची माहिती सूत्रांशी बोलताना मिळाली आहे व काल चाळीसगाव तालुक्याला उपलब्ध झालेला 120 टन युरिया हा अमळनेर येथे रॅक लागल्याने उपलब्ध झाला होता लवकरच चाळीसगाव तालुक्याचा रॅक लागला तर चाळीसगाव तालुक्यासाठी जवळपास 1 हजार टन युरिया उपलब्ध होण्याची शक्यता देखील सूत्रांनी वर्तवली असून युरिया सोबत लागणारे कॉम्प्लेक्स खते त्यात पोटॅश, 15-15, 10-26-26, 16-16-16 व DAP या खतांचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे म्हणून ते दुकानात शिल्लक नाहीत मात्र कुठल्याही क्षणी कॉम्प्लेक्स खते व युरिया चाळीसगाव साठी उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाकडून समजते.

शेतकरी बांधवांनी देखील युरिया व कॉम्प्लेक्स खते घेण्यासाठी शहर व तालुक्यातील होलसेल व किरकोळ दुकानदारांच्या संपर्कात राहिल्यास त्यांना वेळेवर युरिया व खते मिळू शकतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button