Chalisgaon

कुंझर येथे गाव तलावासाठी सेवा सहयोगसंस्था व वंडर लाईन इंडिया प्रा.लि.कंपनी कडून एक लाखाची डिझेल साठी मदत : गुणवंत सोनवणे यांचे सहकार्यातून होणार सार्वजनिक गाव तलाव..

कुंझर येथे गाव तलावासाठी सेवा सहयोगसंस्था व वंडर लाईन इंडिया प्रा.लि.कंपनी कडून एक लाखाची डिझेल साठी मदत : गुणवंत सोनवणे यांचे सहकार्यातून होणार सार्वजनिक गाव तलाव..

एक गाव एक तलाव गुणवंत सोनवणे यांची संकल्पना ठरणार प्रभावि

सोमनाथ माळी चाळीसगाव

चाळीसगाव : कळमडू येथील भुमिपुत्र व पुणे येथे साँप्टवेअर ईजिनिअर असलेले गुणवंत सोनवणे यांच्या अथक प्रयत्नातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यावरण संवर्धनाची व जलसंधारणाची कामे गेली तीन वर्षांपासून सातत्याने सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून कुंझर येथे सार्वजनिक तलावासाठी सेवा सहयोग संस्था व वंडर लाईन प्रा.लि.कंपनी मार्फत डिझेलसाठी १ लाख रुपये मदत उपलब्ध करून दिली व गावानेही डिझेल खर्चासाठी लोक सहभाग करावा यासाठी आव्हान करण्यात आले आहे.
नाम फाउंडेशन व शिवनेरी फाऊंडेशन संचलित भूजल अभियानाच्या माध्यमातून कुंझर येथे लोकसहभागातून नाला खोलीकरण व रुंदीकरण याचे काम चालू आहे. नाम फाऊंडेशनने पोकलँड मशीन उपलब्ध करून दिले असून त्यातून नाला खोलीकरण व रुंदीकरण हे कामे लोकसहभागातून होत आहेत. मात्र नुसते नाला खोलीकरण व रुंदीकरण यावर कामे मर्यादित न ठेवता पाण्याची भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत यासाठीच शिवनेरी फाऊंडेशन संचलित भूजल अभियान मध्ये जल आराखडा तयार करण्याचे काम सहज जलबोधकर उपेंद्र दादा धोंडे व सुजित शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. पाण्यासाठी गाव स्वावलंबी करायचे असतील तर आपल्याला प्रत्येक गावात तलाव, डोह निर्माण करावे लागतील व पुनर्भरणाची कामे करावी लागतील जेणेकरून भूजल पातळी वाढेल. एक गाव एक तलाव ही गुणवंत सोनवणे यांनी संकल्पना मांडली असून , यावर्षी तालुक्यात जल आराखड्यानुसार ५ सार्वजनिक तलाव निर्माण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. यासाठीच त्यांनी कुंझर गावात सार्वजनिक तलाव करण्यासाठी १ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. कुंझर पाणी समिती सर्व कामाच्या तांत्रिकतेवर लक्ष ठेवून आहे, या तलावाच्या जागेची निवड भूगर्भ शास्त्रज्ञ श्री.सुजित शिंपी यांच्या मार्गदर्शनाने केली आहे.
सदर कामाची पाहणी गुणवंत सोनवणे समवेत तालुका समन्वयक राहूल राठोड, महेंद्र पाटील व सदस्यांनी नुकतीच केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button