Maharashtra

अमळनेर तालुक्यात पुन्हा ३१ मे ते ६ जूनपर्यंत कडकडीत बंद

अमळनेर तालुक्यात पुन्हा ३१ मे ते ६ जूनपर्यंत कडकडीत बंद…. जनता संचारबंदीचे नियम जुमानत नसल्याने घेण्यात आला निर्णय…. अमळनेर :- तालुक्यातील नागरिक कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असताना ही संचारबंदी पाळत नसल्याने लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
दि. ३१ मे ते ६ जून पर्यंत कडकडीत बंद पाळण्यात यावा अशी माहिती देण्यात आली आहे. या काळात कृषी संलग्न, दवाखाने व मेडिकल वगळता सर्व दुकाने व सेवा बंद राहतील अशी माहिती देण्यात आली आहे. अमळनेर येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११९ वर पोहचली असली तरी नागरिकांना त्याचे गांभीर्य अद्याप कळून येत नसल्याचे चित्र शहर भरात दिसून येत होते. शुल्लक कारणासाठी दररोज बाजारात नेहमी सारखीच गर्दी होत होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button