येसगी ते गंजगाव जिल्हा मार्ग 41 चे डांबरीकरण करण्याची बांधकाम मंञी अशोकराव चव्हाण यांच्या कडे केली मागणी
नांदेड प्रतिनिधी वैभव घाटे
बिलोली तालुक्यातील मौजे येसगी ते गंजगाव ह्या 6 कि.मी रस्ताची अवस्था वाईट आहे आज देशाला स्वातंत्र्य मिळुन 72 वर्षाचा काळ लोटला असुन एकीकडे जग चंद्रावर जात आहे पण स्वातंत्र्य पासुन शासन आणी प्रशासन गंजगाव ग्रामस्थाना साध्या चिखलातुन वर काठण्यास तयार नाही येसगी ते गंजगाव रस्ता हा जिल्हा मार्ग 41 चा प्रमुख रस्ता आसुन ह्या रस्तावर वाहानाची नेहमीच वर्दळ आसते.कार्ला ते गंजगाव रस्तावर मध्यभागी भयानक नाला आहे.
नाल्यावर सतत पाणीसाठा जमा होत आसल्यामुळे पाऊसाळ्यच्या दिवसात पाऊस झाला तर चार ते पाच दिवस तालुक्याशी संपर्क होत नाही विधानसभा मतदानावर गंजगाव ग्रामस्थाचा बहिष्कार होता परंतु प्रशासनाच्या मद्यस्थितीने व अश्वासनाने बहिष्कार माघार घेण्यात आला विधानसभा मतदान होवुन तिन महिन्याचा कालावधी लोटला पण आजुन रस्ता व पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही मागिल 25-30 वर्षापासुन येथिल जनतेच्या समस्याचा शासनाकडुन निपटारा होवु शकला नाही गावातुन मुख्य रस्ताला जोडता येईल आसा कुठलाच रस्ता शासनाकडुन केला नाही दरवर्षी पाऊसाळ्यात कार्ला ते गंजगाव दरम्यान आसणार्या आणि अतिशय जिर्ण झालेल्या पुलाची उंची अतिशय कमी असल्याने अनेक वेळा संपर्क तुटतो याच भागातुन रेती लीलावाच्या माध्यमातून करोडो रुपये महसुल प्रशासनास प्राप्त होतो पण हाच रस्ता डांबरीकरण करण्यासाठी प्रशासन पुढाकार घेत नाही येसगी ते गंजगाव रस्ताचे डांबरीकरण करणे कार्ला ते गंजगाव मधील नाल्यावर 15 फुट उंचीचे पुलाचे बांधकाम करणे माचनुर ते कोटग्याळ रस्तामधील नाल्यावर पुलाचे बांधकाम करणे इत्यादी मागणीचे निवेदन सरपंच सौ.साविञाबाई घाटे यांनी उपविभागीय अधिकारी मार्फत बांधकाम मंञी अशोकराव चव्हाण यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे






