Nanded

धुळे येथिल शालेय विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा बिलोली भा.ज.प.च्या वतिने निषेध

धुळे येथिल शालेय विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा बिलोली भा.ज.प.च्या वतिने निषेध

नांदेड – वैभव घाटे

धुळे येथे शालेय विद्यार्थ्यांच्या मारहान प्रकरणी जबाबदार पालकमंञी अब्दुल सत्तार , शिक्षण मंञी उदय सामंत व संबधीत पोलीस अधिका-यांवर गुन्हे दाखल करुन मुख्यमंञ्यानी त्यांचा राजनामा घ्यावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन तहसिलदार विक्रम राजपुत यांना देऊन त्याचा बिलोली तालुका भाजप युवा मोर्चाच्या वतिने जाहीर निषेध करण्यात आले.

कोरोना विषाणुमुळे गेल्या ५ ते ६ महिण्या पासुन लाँकडाउनच्या अर्थिक संकटात सापडलेल्या शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक फिस माफ करुन ती परत करावी या व अन्य मागण्या संदर्भात धुळे जिल्ह्याचे पालकमंञी अब्दुल सत्तार याना मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसाकडुन झालेल्या मारहाणीचा बिलोली भाजप युवा मोर्चाच्या वतिने पालकमंञी अब्दुल सत्तार व शिक्षण मंञी उदय सामंत यानी राजनामा द्यावा व संबधीत जबाबादार पोलिस अधिका-याना सेवेतुन निलंबित करावे या मागणीचे तहसिलदार विक्रम राजपुत याना आज दि. २७ आँगस्ट रोजी विविध मागण्यांचे निवेदन देऊन लोकशाहीला काळीमा फासणा-या या घटनेचा जाहिर निषेध करण्यात आला.यावेळी जि.प.सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड ,आनंदराव बिराजदार युवा मोर्चा तालुका अध्यक्ष इंद्रजीत तुडमे, माधव जाधव,मारोती राहिरे,दिलीप उतरवार,सय्यद रियाज,बाबु कुडके ,शिवानंद सोमाशे,राजकुमार गादगे,प्रफुल कल्याणकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button